AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील 10 महत्त्वाचे अपडेट्स, काय-काय घडलं?

वरळी हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील 10 महत्त्वाचे अपडेट्स, काय-काय घडलं?
वरळी हिट अँड रन प्रकरण
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 09, 2024 | 5:45 PM
Share

मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर अटक केली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी मु्ख्य आरोपी मिहीर शाह याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह आणि गाडीचा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या दरम्यान राजेश शाह यांना जामीन मिळाला. पण बिडावत हा अद्यापही अटकेत आहे. दुसरीकडे मिहीर शाह याच्या आई आणि बहिणी घराला कुलूप लावून गायब झाल्या होत्या. आता पोलिसांनी त्यांनादेखील अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस आगामी काळात आणखी सखोल तपास करणार आहेत. आरोपी मिहीर याने अपघाताआधी मध्यरात्री जुहू येथे एका बारमध्ये पार्टी केल्याची माहिती समोर आली होत. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

या प्रकरणातील 10 महत्त्वाचे अपडेट्स:

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तिसऱ्या दिवशी अटक करण्यात आली आहे.
  2. मुख्य आरोपी मिहीर शाह याला मुंबईतूनच पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
  3. मिहीर शाह याची आई आणि दोन बहि‍णींना शहापूरमधून अटक करण्यात आली आहे.
  4. मिहीरला अटक करतानाच, त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्याची आणि दोन्ही बहि‍णींचादेखील समावेश आहे.
  5. आरोपी मिहीर शाह अपघातानंतर मोबाईल स्विच ऑफ करुन फरार होता.
  6. मिहीर शाह मुंबईतल्या काही भागात लपून लपून वास्तव्य करत होता.
  7. याच मिहीर शाहला लपण्यसाठी मदत करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
  8. या प्रकरणात आता किती जाणाना आरोपी करायचं? याबाबत तपास करुन निर्णय घेणार आहेत.
  9. अपघात प्रकरणात मिहिरचे वडील राजेश शाह यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. तर त्याच्या गाडीचा ड्रायव्हर अद्यापही अटकेतच आहे.
  10. वरळी हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...