मेगाभरती करा, नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी नेत्यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबईत आज ओबीसी समाजाची पहिली राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील प्रमुख नेते हजर होते. | OBC

मेगाभरती करा, नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी नेत्यांचा ठाकरे सरकारला इशारा
प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते

मुंबई: राज्य सरकारने लवकरात लवकर मेगाभरतीची प्रक्रिया सुरु करावी. अन्यथा ओबीसी (OBC) समाजाकडून मेगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. त्यासाठी येत्या 20 तारखेला ओबीसी समाजाकडून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. (OBC leader Prakash Shendge warns Thackeray government)

मुंबईत आज ओबीसी समाजाची पहिली राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील प्रमुख नेते हजर होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. ठाकरे सरकारने मेगाभरतीची प्रक्रिया राबवावी. अन्यथा आम्ही मेगा आंदोलन करु, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारच्या वेळकाढूपणावर टीका केली होती. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून (EWS) आरक्षण देण्यात आले आहे. राज्य सरकारने गरीब मुलांची भरती प्रक्रिया रोखली आहे. ही भरती थांबवू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. तरीसुद्धा भरती प्रक्रिया घेतली जात नसल्याचा आरोप शेंडगे यांनी केला होता.

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

यापूर्वी विजय वडेट्टीवारांनी ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढण्याचा इशारा दिला होता. सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळ पडल्यास ओबीसींचीही शक्ती दाखवू. ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला होता.
ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे. ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगाभरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते.

OBC महामेळाव्याचं आयोजन, 1 लाख लोक येणार

राज्यातील ओबीसी समाजात असंतोष आहे. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहे. नागपुरातही ओबीसींचा महामेळावा होईल. या मेळाव्यात राज्यभरातून तब्बल 1 लाख लोक येतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? : विजय वडेट्टीवार

(OBC leader Prakash Shendge warns Thackeray government)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI