AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत

CM Joseph Vijay Tamilnadu: तामिळनाडूमध्ये अखेर विजय पर्वाला सुरूवात झाली. जोसेफ विजय, सुपरस्टार थलपती विजय याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला असला तरी त्याचा जल्लोष मुंबईतील धारावीत दिसून आला.

Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत
सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीतImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 10, 2026 | 10:44 AM
Share

CM Joseph Vijay Tamilnadu: तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठलाय. आताच त्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्याचे आई-वडील, पक्षातील आमदार, त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण त्याची पत्नी आणि मुलं याची अनुपस्थितीचीच सर्वाधिक चर्चा झाली. तामिळनाडूतील त्याचे चाहते आनंदीत झाले आहे. टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत आली असली तरी जोसेफ विजयची मुख्यमंत्रीपद वर्णी लागल्याने मुंबईतील धारावी परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धारावी ‘विजय’मय

थलापती विजय यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी परिसरात ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावून आनंद साजरा केला. धारावीतील तामिळ समाजासह अनेक युवकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. विजय यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. धारावीतील विविध भागांमध्ये “वेलकम सीएम थलापती” तसेच “TVK ची ताकद तामिळनाडूत दिसणार” अश आशयाचे बॅनर्स लागले आहेत. धारावीतील TVK समर्थकांनी पुढील काळात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क मोहीम राबवण्याचे संकेतही दिले आहेत.

राहुल गांधी सुद्धा शपथविधीला

सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर विजय यांचा मुख्यमंत्री‍पदाचा मार्ग मोकळा झाला. विजय यांनी शनिवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे 121 आमदारांच्या पाठिंब्यांचं पत्र दिलं. तर नुकताच त्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सोहळा झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या होत्या. तर मॅजिक फिगर 118 इतकी होती. काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्याला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता. पण इतर संख्याबळ जमवताना थलपतीला नाकीनऊ आले. गेल्या तीन दिवसांपासून बहुमताचा आकडा गाठताना त्याची मोठी दमछाक झाली. अखेर 6 आमदारांची जुळवाजुळव करायला त्याला तीन दिवस लागले आणि सत्तेचे घोडे एकदाचे नाहले. आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी थलपती विजयला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्याने अचाट म्हणावी अशी आश्वासनं जनतेला दिली आहेत.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद