कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, ‘या’ दोन औषधांचं मिश्रण ठरतंय रामबाण

एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरून कमी होऊन आता 5 ते 6 दिवसांवर आलाय.

कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, 'या' दोन औषधांचं मिश्रण ठरतंय रामबाण
Barshi solapur Antibody Cocktail treatment
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:50 PM

मुंबईः कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या (अँटीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आलेत. विशेष म्हणजे हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरलाय. कारण हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (0.5 टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्‍यू दरामध्ये तब्‍बल 70 टक्‍के घट झाली. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरून कमी होऊन आता 5 ते 6 दिवसांवर आलाय. (The experiment of cocktail antibodies is successful, the combination of these two drugs is becoming a panacea)

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोविड बाधितांवर उपचारांसाठी करण्‍यात आला. हा प्रयोग अत्‍यंत यशस्‍वी ठरला आहे. कोविड बाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर 2020 पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोविड बाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation मान्‍यता दिली.

दोन्‍ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करून कोविड बाधितांवर उपचार

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब ही प्रतिपिंड औषधी (antibodies medicine) आहेत. या दोन्‍ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करून कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्‍यांचे वय 12 वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन 40 किलोपेक्षा जास्‍त आहे, अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. सौम्‍य ते मध्‍यम (mild to moderate) स्‍वरुपात ज्‍यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्‍य होते.

औषधोपचार पद्धती प्रायोग‍िक तत्‍त्‍वावर प्रारंभी सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात राबविली

महापालिका आरोग्‍य प्रशासनाने ही मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोग‍िक तत्‍त्‍वावर प्रारंभी सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात राबविली आहे. आजवर 212 कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्‍यात आले. पैकी 199 रुग्‍णांचे उपचारअंती निष्‍कर्ष प्राप्‍त झालेत. त्‍याचा सविस्‍तर अभ्‍यास प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. या 199 रुग्‍णांमध्‍ये 18 ते 45 वर्ष वयोगटातील 101 रुग्‍ण, 45 ते 59 वर्ष वयोगटातील 45 रुग्‍ण तर 60 वर्ष वयोगटावरील 53 रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण 199 पैकी 74 जणांना किमान एक तरी सहव्‍याधी (co-morbidity) आहे.

अँटीबॉडीज कॉकटेलचा हा प्रयोग यशस्‍वी होत असल्‍याचे प्राथमिक निष्‍कर्ष

कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर अँटीबॉडीज कॉकटेलचा हा प्रयोग यशस्‍वी होत असल्‍याचे प्राथमिक निष्‍कर्ष हाती आल्‍याने महापालिका प्रशासनाने या औषधांचा वापर करता यावा यासाठी पुरेशी तयारी केली. कोविडचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य सेवा-सुविधा सुसज्‍ज असताना, तसेच लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती यशस्वी, रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी, राज्यातील पहिलाच प्रयोग

राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करा : उद्धव ठाकरे

The experiment of cocktail antibodies is successful, the combination of these two drugs is becoming a panacea

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.