मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?

| Updated on: Feb 21, 2021 | 9:50 AM

वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहाता पुढील 15 दिवस महत्वाचे असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?
corona virus Update
Follow us on

मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने विशेष लक्ष घातलं आहे (The next 15 days are important for Maharashtra). वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहाता पुढील 15 दिवस महत्वाचे असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधावर भर देण्यात येत आहे. तसेच, प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे (The next 15 days are important for Maharashtra).

रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे कमी केल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सहवासितांचा शोध (contact tracing) आणि निदान यावर अधिकाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

एका रुग्णामागे किमान 20 ते 30 व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांच्या चाचण्या करुन निदान प्रक्रियेत आणण्यात येईल.

राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?

शनिवारी  राज्यात 6281 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 2561 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19,92,530 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 48,439 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.16% झाले आहे.

मुंबईची स्थिती काय?

मुंबईत गेल्या 24 तासात 571 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या 2,99,006 वर पोहोचली आहे. काल मुंबईत 823 नव्या रुग्णांची नोंद झालीये. तर मुंबईत आज दिवसभरात 897 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या एकूण 6,900 सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांची स्थिती काय?

पुण्यात 17 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 428 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढून 465 नवे रुग्ण आढळले होते. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 527 रुग्ण आढळले होते. म्हणजेच मागील काही दिवसांचा अभ्यास केला, तर पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या पुण्यात 2561 जणांवर उपचार सुरु आहे. यापैकी 160 जण व्हेंटिलेटरवर असून काल दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात काल 414 नवे कोरोना रुग्ण आढळले होते.

काल दिवसभरात 247 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. एक रूग्ण पुण्याबाहेरील. होता. सध्या 160 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णसंख्या 197330 इतकी आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2561 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 4821 जणांचा मृत्यू झाला आहे (The next 15 days are important for Maharashtra).

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यानंतर सर्वाधिक 9443 चाचण्या झाल्या. त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह येण्याचं प्रमाण सध्या 7.67 टक्के इतक्यावर पोहोचला आहे. तर 6 जणांचा मृत्यू , तर 502 जण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात सतत होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत आहे.

The next 15 days are important for Maharashtra

संबंधित बातम्या :

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!