यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!

संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका, नगरपालिका खडबडून जाग्या झाल्या असून कोरोना रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत.

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचं मिशन

यवतमाळ : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका, नगरपालिका खडबडून जाग्या झाल्या असून कोरोना रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. यावेळी विदर्भात तर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळाला आहे. यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. (corona cases rise again in Yavatmal, Districy Collector warns people)

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, नागरिक मास्क लावतात की, नाही त्याची पाहणी केली.

प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्‍यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंडही केला. तसंच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

के.डी.एम.सी. आयुक्त अ‌ॅक्शन मोडमध्ये

गर्दीच्या ठिकाणी रिक्षातून जनजागृती

कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील रेड झोन, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, मार्केटस् घाऊक बाजारपेठा, भाजीपाला मार्केटस् या ठिकाणी अनावश्यक गर्दी होवू नये या करिता महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय व्यापक जनजागृती, रिक्षांमधून नागरिकांना आवाहन करणे आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितलं.

वेळ पडल्यास खासगी रुग्णालये ताब्यात घेणार

कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या नारिकांची कोविड चाचणी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅाप, एसटी स्टॅन्ड आदी ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार असून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेचे विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर्स पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्यात येतील असे सांगून याबाबत शहरातील डॅाक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी समन्वय सुरू आहे. त्याचबरोबर कोविड १९ चाचण्यासाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोग शाळा व्यवस्थापनांशीही चर्चा सुरू असून शहरात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात याचे नियोजन करण्यात आले आहे, असं ते म्हणाले.

(corona cases rise again in Yavatmal, Districy Collector warns people)

हे ही वाचा :

Video : पावसातल्या सभेला कारणीभूत साहेब नाहीत, तो एक माणूस, सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित फोडलं

Video : जादू मंतरली कुणी सपनात जागंपणी नशिबी भोग असा दावला शालूची दमदार अदा पाहून चाहते घायाळ!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI