Video : पावसातल्या सभेला कारणीभूत साहेब नाहीत, तो एक माणूस, सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित फोडलं

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar Satara Speech) पावसात झालेल्या सभेचं गुपित फोडलं.

Video : पावसातल्या सभेला कारणीभूत साहेब नाहीत, तो एक माणूस, सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित फोडलं
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 8:38 PM

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या (NCP Navi Mumbai) कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar Satara Speech) पावसात झालेल्या सभेचं गुपित फोडलं. (Supriya Sule about Sharad Pawar’s famous speech in Satara)

“साताऱ्यातील त्या सभेला शरद पवार नाही तर शशिकांत शिंदे जबाबदार आहेत. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. साताऱ्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे सभा रद्द करण्याच्या विचार सुरु होता. संध्याकाळच्या सुमारास मला शिंदे यांचा फोन आला. मी प्रचारात होते त्यामुळे त्यांचा फोन घेतला नाही. नंतर त्यांना फोन केल्यावर ते म्हणले की, ताई मी सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता. मला प्रश्न पडला की साहेब तर साताऱ्यात आहेत. मग हे असं का बोलत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई सभा झाली, पवार साहेब पूर्ण भिजले. मी कपाळाला हातच लावला. मी म्हणलं, अहो असं काय करताय. माझे वडील 80 वर्षांचे, पायाला जखम झाली आहे. तेव्हा ते म्हणाले मी आणि साहेबांनी ठरवलं की सभा करायचीच. मग काय झालं असं विचारल्यावर ते म्हणाले की, काही नाही सभा झाली. साहेब भिजले. आता साहेब तयार झालेत आणि माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय. हे सगळं ऐकून मी पूर्ण शॉक होते”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं चित्र पालटवणारी साताऱ्यातील ती सभा ही शशिकांत शिंदे यांनी घडवून आणल्याचं आज सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

भरपावसातील भाषणात शरद पवार काय म्हणाले होते?

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात भाषण केलं होतं. 18 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या भाषणात, शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता. शरद पवार म्हणाले होते, “चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी सगळेजण 21 ऑक्टोबरची (मतदाना दिवशीची) वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील.”

सभेच्या वर्षपूर्तीवेळी राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

18 ऑक्टोबर 2020 रोजी पवारांच्या सभेला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन भाजपला जोरदार चिमटे काढण्यात आले. ‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली,’ अशा शब्दात राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील क्षणचित्रं शेअर केली होती.

आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल

रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भर पावसात भाषण केलं. उपस्थितांनी देखील पावसात उभं राहून हे भाषण ऐकलं. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण काढली जातेय. रोहित पवार यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधन करत त्यांच्या उपक्रमांचं कौतुकही केलं. हा शिवजयंती कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

रोहित पवार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) जामखेडमध्ये आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र, अशाही स्थितीत रोहित पवार यांनी आपलं भाषण बंद न करता उपस्थितांशी संवाद सुरूच ठेवला.

संबंधित बातम्या : 

VIDEO: आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल, रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का?

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

Supriya Sule about Sharad Pawar’s famous speech in Satara

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.