AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya sabha election:जनता अडचणींचा सामना करतेय आणि सत्ताधाऱ्यांचा पंचातारांकित निवडणुकांचा खेळ, मनसेचे जोरदार टीकास्त्र, एमआयएमची मदत कशासाठी?

निजामाची अवलाद असलेल्या एमआयएमची निवडणुकीत मदत घेऊन, महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली आहे, अशी टीका मनसेने केली आहे.

Rajya sabha election:जनता अडचणींचा सामना करतेय आणि सत्ताधाऱ्यांचा पंचातारांकित निवडणुकांचा खेळ, मनसेचे जोरदार टीकास्त्र, एमआयएमची मदत कशासाठी?
MNS on MVAImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 10:20 AM
Share

मुंबईराज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असलेल्या राज्यसभा निवडणूक (Rajya sabha election)नाट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सडकून टीका केली आहे. एकीकीडे राज्यातील जनता अडचणींचा सामना करीत असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित खेळ सुरु आहे, अशी टीका मनसेचे (MNS)प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. राज्यसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने (Shivsena BJP) प्रतिष्ठेची केली आहे. सहाव्या उमेदवारावरुन जोरदार डावपेच होत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो आहे, दुसरीकडे राज्यातील समस्या मात्र तशाच असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे. एमआयएमच्या घेतलेल्या पाठिंब्याबाबतही टीका करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने जनाची नव्हे पण मनाचीही सोडली -मनसे

निजामाची अवलाद असलेल्या एमआयएमची निवडणुकीत मदत घेऊन, महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली आहे, अशी टीका मनसेने केली आहे. एमआयएमच्या दोन आमदारांनी आज सकाळी मविआला पाठिंबा देत, त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यानिमित्नतानं शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे. अशी टीकाही मनसेने केली आहे. राज्याची शोभा करणारी ही निवडणूक असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कोट्यवधींचा चुराडा आणि मविआत बिघाडी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये आणि आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीत हॉटेल मालकांचे पितळ मात्र चांगलेच पिवळे झाले आहे. या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याची टीका करण्यात येते आहे. मात्र इतके करुनही शेवटच्या काही काळात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मतांचा कोटा ४४ केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याची माहिती आहे. यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आल्याचे मानण्यात येते आहे. त्यामुळे यानिमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे सांगण्यात येते आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.