दिवसभर नुसतंच वारं घोंघावत होतं, बिपरजॉय आलं गेलं, ट्वीटरवर मात्र मिम्सचा पाऊस

एरव्ही मुंबईत 6 जूनला हटकून येणारा पाऊस यंदा 10 जून उजाडला तरी पावसाचा काही पत्ता नसल्याने मुंबईकर कातावले आहेत. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाने तरी पाऊस पडेल ही आशा धुळीस मिळाली आहे.

दिवसभर नुसतंच वारं घोंघावत होतं, बिपरजॉय आलं गेलं, ट्वीटरवर मात्र मिम्सचा पाऊस
memesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 8:34 PM

मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांच्या कानात कालपासून नुसतचं वारं घोंघावतयं… परंतू ढगांशी झुंझणारा वारा असला तरी ढगांच्या दाटी ऐवजी कडकडीत ऊन पडल्याने मुंबईकर हिरमुसले आहेत. परंतू घामाने भिजलेल्या मुंबईकरांच्या प्रतिभेला मात्र याही वातावरणात अक्षरश: धुमारे फुटल्याचे समाजमाध्यमावर दिसत होते. विकेण्डला तरी पावसाच्या धारा कोसळून उकाडा आणि काहीलीपासून काही तरी दिलासा मिळेल असे वाटले होते. परंतू बिटरजॉय चक्रीवादळ ( Biparjoy ) पुन्हा गुजरातकडने गेल्याने पश्चिम रेल्वेवर ( WesternRailway )  मात्र वैतरणा पुलावर ( Vaitarna ) ओव्हरहेड वायरचा मास्ट कोसळून लोकलची ( Mumbai Local ) वाहतूक विस्कळीत झाली.

एरव्ही मुंबईत 6 जूनला हटकून येणारा पाऊस यंदा 10 जून उजाडला तरी पावसाचा काही पत्ता नसल्याने मुंबईकर कातावले आहेत. यंदा अल- निनोचा प्रभाव असल्याने मान्सूनच्या प्रमाणावर काही फरक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेला सरासरी पावसाचा अंदाज त्यामुळे चुकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळात पावसाचा 1 जूनला होणारा शिरकाव यंदा लांबला असल्याने पावसाचे मुंबईतले आगमनही लांबले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घामाच्या धारांमध्ये आणखी किती दिवस भिजावे लागतेय हे आता मान्सूनच्या आगमनावरच अवलंबून आहे.

राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने गेले काही दिवस दिलासा दिला असला तरी मुंबईत काही पाऊसाचा काही पत्ता नसल्याने चटके देणाऱ्या कडक उन्हाचेच काही दिवस दर्शन होत आहे. त्यात हवामान खात्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन मान्सून लांबणार असे भविष्य वर्तविले होते.

समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला 48 तासांत बसणार असे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. चक्रीवादळाच्या आगमनाने महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने मुंबईत डोक्यावर कडक ऊन्हं, परंतू कानात घोंघावतंय वारं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर सोशल मिडीयावर ट्वीटर आणि फेसबुकवर अनेक मजेशीर मिम्स फिरत आहे. मुंबई रेन #MumbaiRains  नावाने ट्वीटरवर ट्रेंडच सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.