5 लाखांची अंडी पळवणारा अंडीचोर सापडला

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ, कल्याण: अंबरनाथमध्ये पाच लाखांच्या अंडी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एका अंडीचोरासह मुद्देमाल हस्तगत केला आहे.  उल्हासनगर गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अंडीचोर आरोपी वाडा तालुक्यात ट्रक लपवून बसला होता. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. काय आहे संपूर्ण प्रकरण? कर्नाटकातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने […]

5 लाखांची अंडी पळवणारा अंडीचोर सापडला
Follow us

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ, कल्याण: अंबरनाथमध्ये पाच लाखांच्या अंडी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एका अंडीचोरासह मुद्देमाल हस्तगत केला आहे.  उल्हासनगर गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अंडीचोर आरोपी वाडा तालुक्यात ट्रक लपवून बसला होता. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कर्नाटकातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने अडवलं. ट्रकचालकासह त्याच्या मुलाला मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये नेऊन टिटवाळा परिसरातील जंगलात सोडून दिलं. त्यानंतर चोरटे ट्रक घेऊन फरार झाले आहे. या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपयांची अंडी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चोरीला गेलेली अंडी, ट्रक आणि चोरांचा शोध सुरु केला होता.

कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर येथून मोहमंद नबी उस्मानसाहेब शेख (वय 44 वर्षे) हा ट्रकचालक त्याचा मुलगा मुजम्मिल (वय 17 वर्षे) याच्यासोबत अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन अंबरनाथकडे निघाले होते. या ट्रकमध्ये 4 हजार 700 ट्रे कोंबडीची अंडी होती. म्हणजेच, सुमारे 1 लाख 41 हजार नग 5 लाख रुपये किंमतीची अंडी होती. महाराष्ट्र एग्ज सेंटर यांच्यापर्यंत अडी पोहोचवायची होती.

पहाटेच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथील टी सर्कल ग्रीनसीटीच्या बाजूने येत असताना ट्रकच्या पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने तो ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकचालक मोहमंद शेख व त्यांचा मुलगा यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्याला कापडी रुमाल बांधून त्यांच्या खिशातील दोन हजारांची रोख रक्कम, मोबाईल फोन प्रथम काढून घेतला आणि त्या दोघांना जबरदस्तीने कारमधून नेवून टिटवाळा परिसरातील रायता येथील निर्जन स्थळी जंगलात  सोडले होते.

पोलिसांनी आता एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI