AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक; मोठे निर्णय घेणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आता राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक; मोठे निर्णय घेणार
nana patoleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 12:49 PM
Share

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला आहे. तर भाजपचा दणकून पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधकांचं बळ वाढलं आहे. कर्नाटकातील विजयानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीने एक तातडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच त्याचं सुतोवाचही केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा? यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

फूट पडू नये म्हणून

लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे 10 महिने राहिले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केली आहे. जागा वाटपातील संभाव्य मतभेदांमुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीचे नेते सावध आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

रणनीती ठरवली जाईल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. 2024च्या दृष्टीने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती काय असेल? जागा वाटपाचं सूत्रं काय असेल हे ठरवलं जाईल. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. सर्व नेते भेटणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

पुरा देश बाकी है…

इंदिरा गांधींच्या बाबतीत जे झालं तेच आता होत आहे. कर्नाटक तो झांकी है पुरा महाराष्ट्र नही, पुरा देश बाकी है. महाराष्ट्र हे लुटीचं राज्य आहे. फार काळ त्यांच्याकडे राहणार नाही. जे कर्नाटकात झालं. तेच महाराष्ट्रात होईल, असं राऊत म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.