परिवहन खात्यातील कर्मचाऱ्याची मंत्र्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार; अनिल परब म्हणतात…

नाशिकमधील परिवहन खात्यातील निलंबित कर्मचाऱ्याने थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (transport minister anil parab denied the allegations of suspended transport inspector)

परिवहन खात्यातील कर्मचाऱ्याची मंत्र्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार; अनिल परब म्हणतात...
अनिल परब, परिवहन मंत्री.
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 7:09 PM

मुंबई: नाशिकमधील परिवहन खात्यातील निलंबित कर्मचाऱ्याने थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच परिवहन विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा दावाही या तक्रारीत केला आहे. त्यावरून राजकारण रंगलेलं असतानाच परिवहन मंत्री अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (transport minister anil parab denied the allegations of suspended transport inspector)

अनिल परब यांनी एकापाठोपाठ एक सहा ट्विट करत निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, असं परब यांनी म्हटलं आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

सत्य जनतेसमोर येईलच

मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे, असा दावा करतानाच या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे. (transport minister anil parab denied the allegations of suspended transport inspector)

संबंधित बातम्या:

100 कोटींची महावसुली 300 कोटींवर?, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या

(transport minister anil parab denied the allegations of suspended transport inspector)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.