Travel Mumbai: खारघरची विशेष ओळख पांडवकडा धबधबा! आदित्य ठाकरेंच्या निर्णयामुळे होणार विकास, 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Travel Mumbai: मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे शहरासह एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांचे विशेष आकर्षण असलेला पांडवकडा धबधबा पाहण्याचा आनंद लवकरच सर्वांना लुटता येणार आहे.

Travel Mumbai: खारघरची विशेष ओळख पांडवकडा धबधबा! आदित्य ठाकरेंच्या निर्णयामुळे होणार विकास, 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Pandavkada Waterfall
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jul 03, 2022 | 9:29 AM

नवी मुंबई: पांडवकडा धबधबा (Pandavkada Waterfall) ही खारघरची (Kharghar) विशेष ओळख आहे. या परिसराचा विकास झाला तर पर्यटकांना धबधबा पाहण्याचा आनंद जवळून लुटता येणार आहे. या क्षेत्राचा विकास झाला तर खारघरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढणार असून शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त करून हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावल्यामुळे तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thcakrey) यांचे आभार मानले आहेत. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे शहरासह एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांचे विशेष आकर्षण असलेला पांडवकडा धबधबा पाहण्याचा आनंद लवकरच सर्वांना लुटता येणार आहे. पांडवकडा पर्यटन क्षेत्रासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शिवसेनेचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इत्यादी शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटकांना पाहता यावा, यासाठी तिथे पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी संरक्षक उपाययोजना तयार करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. पावसाळ्यामध्ये खारघर परिसरातील पारिसक डोंगरातून सुरू होणारा पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक प्रत्येक वर्षी उत्सुक असतात. मात्र तिथे घडलेल्या दुर्घटनांमुळे या क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून प्रवेश बंदी लागू केली जाते. त्यामुळे हजारो पर्यटकांचा हिरमोड होत होता.

हे सुद्धा वाचा

सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पांडवकडा पर्यटन क्षेत्राच्या विकासाची मागणी केली. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी पांडवकडा परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें