AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tree Fall | अंगावर झाड नाही, संकटच कोसळलं, दादरमधल्या घटनेत शिक्षिकेच्या आयुष्याची वाताहात

Tree Fall | नशीब आणि नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. असं काही ताई सोबत होईल, असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल, असं शाईनी लोपेज यांनी सांगितलं.

Tree Fall | अंगावर झाड नाही, संकटच कोसळलं, दादरमधल्या घटनेत शिक्षिकेच्या आयुष्याची वाताहात
Romilda Dsouza
| Updated on: Oct 04, 2023 | 2:55 PM
Share

मुंबई : मागच्या आठवड्यात दादरमध्ये एक दुर्देवी घटना घडली. एका 35 वर्षीय महिलेच्या अंगावर झाड कोसळलं. झाडच्या रुपाने संकटच या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर कोसळलं. महिलेला तिच्या शरीराची हालचाल करता येत नाहीय. या महिलेच्या उपचाराचा खर्च उचलताना तिच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागतोय. आतापर्यंत उपचारांच बिल लाखोच्या घरात गेलं आहे. रोमिलदा डिसूझा असं जखमी महिलेच नाव आहे. रोमिलदा प्रभादेवीच्या कॉनवेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. 25 सप्टेंबरला त्या आपल्या वसईतील घरातून शाळेत जाण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या. ट्रेनने दादरला पोहोचल्या. दादर स्टेशनपासून जवळच विसावा रेस्टॉरंट आहे. या हॉटेलच्या विरुद्ध दिशेला असलेलं झाड रोमिलदा डिसूझा यांच्या अंगावर कोसळलं. या अपघातमुळे आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. असं काही ताई सोबत होईल, असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल, असं शाईनी लोपेज यांनी सांगितलं.

शाईनी रोमिलदाचा लहान बहिण आहे. घटनेच्यावेळी रोमिलदा यांच्यासोबत आणखी एक शिक्षिक होती. त्या सुद्धा जखमी झाल्या आहेत. “माझ्या बहिणीवर माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या पाठिच्या कण्याला मार लागला. दुर्घटनेच्या दिवशीच शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही माझी बहिण ICU मध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, यानंतर त्या सामान्यपणे चालू शकत नाही. उपचार दीर्घकाळापर्यंत चालतील” असं लोपेझ म्हणाल्या. रोमिलदा यांच्यावर व्यवस्थित उपचारांसाठी आणखी 45 दिवस लागतील. त्याचा खर्च 17 लाखाच्या घरात आहे. तिला फार पगार नाहीय

त्यानंतर घरी वर्षभर उपचार करावे लागतील. हा सगळा खर्च 25 लाखाच्या घरात जातो. “आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. आतापर्यंत आम्ही आमची सर्व बचत वापरली आहे. रोमिलदा ताईवर अजून जितका वेळ उपचार चालणार तो खर्च उचलण आमच्यासाठी कठीण आहे. ती एक शिक्षिक आहे. तिला फार मोठा पगार नाहीय. तिला एक नऊ वर्षाची मुलगी आहे, जी तिच्यावरच अवलंबून आहे” असं लोपेझ म्हणाल्या.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.