AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरेंचा वार, शिंदे-फडणवीसांचा पलटवार, पाहा व्हिडीओ

ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस तसंच मोदी, शाहांवर जोरदार हल्लाबोल केला होता.. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. याच संदर्भातील वाचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरेंचा वार, शिंदे-फडणवीसांचा पलटवार, पाहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 11, 2024 | 11:21 PM
Share

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उद्धव ठाकरेंबाबत पाठीमागे काय बोलतात ते कोणी तरी रेकॉर्ड करावं म्हणजे खरा नमक हराम  2 कोण हे समजेल, काँग्रेस कशी लबाड आहे, हे काल उद्धव ठाकरेंनीच सांगितलं.वीजबील माफीवरून काँग्रेसच्या चलाखीवर स्वत: उद्धव ठाकरेच बोलले. ही योजना काँग्रेसची लबाडाची योजना नाहीये.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापायला लागलंय. ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदे, फडणवीस हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलं. दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नक्कल उतरवत त्यांना टोला लगावला.. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलात पाठवलं असतं असा टोला शिंदेंनी लगावला. एवढंच नव्हे तर लाडकी बहीणवरुन देखील उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. 15 लाखांचे 1500 कसे झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

पाहा व्हिडीओ:-

उद्धव ठाकरेंच नव्हे तर संजय राऊतांनी देखील एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. चित्रपटाच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिंदेंना धारेवर धरलं. तसंच मलाही चित्रपट काढायचा आहे असं म्हणत शिंदेंवर जोरदार निशाणाही साधला. मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी मोदी, शाहांसह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवरही टीकास्त्र डागलंय. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदें, फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा