Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘1500 नको, आधी बहिणींची अब्रू वाचवा’, श्रेयवादावरुन ठाकरे, पवारांनी महायुतीला धरलं धारेवर, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन मविआनं पुन्हा एकदा महायुतीवर टीकास्त्र डागलंय... पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. तर महायुतीमधील श्रेयवादावरुन उद्धव ठाकरेंनी महायुतीला धारेवर धरलंय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : '1500 नको, आधी बहिणींची अब्रू वाचवा', श्रेयवादावरुन ठाकरे, पवारांनी महायुतीला धरलं धारेवर, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 11:40 PM

लाडकी बहीण योजनेवरुन सुरु झालेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. लाडकी बहीण योजनेवरुन शरद पवारांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं आणि संरक्षण देणं जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.

पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणे आणि संरक्षणाची गरज. फक्त शरद पवारच नव्हे शिर्डीतून उद्धव ठाकरेंनी देखील लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असलेल्या श्रेयवादावरुन देखील उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय. जनतेचा पैसा खाऊ आणि मीच तुझा भाऊ असं महायुतीत सुरु, दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असेलली श्रेयवादाची लढाई. कधी दादांच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. तर कधी भाजप-शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो नव्हता.

पाहा व्हिडीओ:-

मुख्यमंत्री शब्द वगळला आणि फक्त माझी लाडकी बहीण शब्द वापरला. बारामतीत देवाभाऊ म्हणून बॅनर लागले त्यावर आक्षेप घेतला नाही. लाडकी बहीण योजनेवरुन मागील काही दिवसांपासून राजकारण सुरु आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बहिणींची आठवण आल्याची टीका विरोधकांनी केलीय. दरम्यान विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....