AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा दुसराच? उद्धव ठाकरेंना शंका!

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला. मॉरिस भाई याने गोळ्यावर झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Video : Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा दुसराच? उद्धव ठाकरेंना शंका!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 10, 2024 | 10:52 PM
Share

मुंबई : दोन दिवसांआधी, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळीबार करुन हत्या झाली. मात्र हा गोळीबार मॉरिसनंच केला की आणखी कोणी? अशी शंका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय. अभिषेक आणि मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का ? असा सवालही ठाकरेंचा आहे. अभिषेक घोसाळकरांची हत्या आणि मॉरिसच्या आत्महत्येनंतर, उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेत.

फेसबुक लाईव्हचा जो व्हिडीओ समोर आला त्यात मॉरिस, अभिषेक घोसाळकरांना गोळ्या झाडताना दिसत नाही. त्यामुळं अभिषेक आणि मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का?, अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलीय. गोळ्या मॉरिसनंच चालवल्या का? की अभिषेक, मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का? पोलीस तपासातून आतापर्यंत हेच समोर आलंय, की मॉरिसनं आधी अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर, मॉरिसनं स्वत:वर गोळ्या झाडल्या. मात्र मॉरिसलाही दुसऱ्याने गोळी घातली का? असा प्रश्न ठाकरेंचा आहे.

उद्धव ठाकरेंपाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यानं खळबळ उडवली. घोसाळकरांच्या हत्येमागं सत्ताधारी पक्षातीलच प्रवक्ता असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. तर गृहमंत्री फडणवीसांनी जग्गा जासूस म्हणत वडेट्टीवारांच्या दाव्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत दोघांपर्यंत पोलिसांचा तपास येवून ठेपलाय. एक म्हणजे मॉरिसचाच बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच मिश्राकडील पिस्तुलमधून मॉरिसनं गोळीबार केला. अमरेंद्र मिश्रा अटकेत असून 13 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दुसरा आहे, मॉरिसचा जवळचा मित्र मेहुल पारेख. मेहुल पारेखची गोळीबाराच्या दिवशी घटनास्थळी नव्हता पण मॉरिसचा मित्र असल्यानं त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या संपूर्ण घटनेनंतर, अटकेत असलेल्या अमरेंद्र मिश्राची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. कोर्टातून पोलीस नेत असताना, आपल्यावर अन्याय झाला असून फसवण्यात आल्याचं अमरेंद्र मिश्रा ओरडून सांगत होता.

बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्याच पिस्तुलनं मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला. पिस्तुल रोज रात्री ऑफिसमध्ये ठेवायची याच अटीवर मॉरिसनं अमरेंद्र मिश्राला नोकरीवर ठेवल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलंय. अमरेंद्र मिश्रा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून त्यानं पिस्तुलचा परवाना मिळवला होता. मॉरिसचा बॉडीगार्ड, त्या दिवशी त्याच्यासोबत नव्हता त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं, असं असं अमरेंद्र मिश्राच्या पत्नीचं म्हणणंय पोलिसांना मिश्राची 13 तारखेपर्यंत कोठडी मिळालीय आणि एक एक अँगलचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच