AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : टीव्ही9 Special Report : ‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय…’, युक्तिवादावेळी सरन्यायाधीशांची एक टिप्पणी ठरली लक्षवेधी

सिब्बलांचं ऐकलं तर आमदार अपात्र होऊ शकतात, असं सरन्यायाधीश म्हणालेत. पण अपात्रतेचा निर्णय कोर्टच करणार की विधानसभेचे अध्यक्ष, यावरुनही युक्तिवाद रंगलाय. पाहुयात

Video : टीव्ही9 Special Report : 'आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय...', युक्तिवादावेळी सरन्यायाधीशांची एक टिप्पणी ठरली लक्षवेधी
CM EKNATH SHINDE AND UDDHAV THACKAREY Image Credit source: TV9 NETWORK
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 22, 2023 | 10:36 PM
Share

मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचाच युक्तिवाद झाला. मात्र यावेळी सरन्यायाधीशांची एक टिप्पणी लक्षवेधी ठरलीय. सिब्बलांचं ऐकलं तर आमदार अपात्र होऊ शकतात, असं सरन्यायाधीश म्हणालेत. पण अपात्रतेचा निर्णय कोर्टच करणार की विधानसभेचे अध्यक्ष, यावरुनही युक्तिवाद रंगलाय. पाहुयात

आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात घटनापीठासमोर सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आणि अपात्रतेचा निर्णय तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे देण्याची मागणी केली. सिब्बल यांनी युक्तिवाद करताना काय म्हटलंय तेही पाहुयात.

जुन्या अध्यक्षांनाच पुन्हा नियुक्त करा, नव्या अध्यक्षांची नियुक्ती अवैध आहे. नव्या अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात का? आसाममध्ये बसून आमदार पक्षाची धोरणं ठरवू शकत नाहीत. सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एकनाथ शिंदेंनी व्हीपचं उल्लंघन केल्याचंही म्हटलंय. गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर आहेगोगावलेंच्या नियुक्तीच्या पत्रात बैठकीचा उल्लेख नाही. राज्यपाल हे घटनात्मक पद, मात्र राज्यपालांनी राजकारण केलं एकनाथ शिंदे कोणत्या अधिकारानं राज्यपालांकडे गेले. राज्यपालांनी वेळीच रोखणं गरजेचं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाहीराजकीय पक्ष आणि विधीमंडळातील पक्ष दोन्ही वेगळ्या गोष्टी राजकीय पक्ष म्हणजे आई, विधीमंडळातील पक्ष म्हणजे बाळ केवळ 38 आमदार पक्षाचं धोरण ठरवू शकत नाही. पक्षाच्या विरोधात मतदान करणं म्हणजे अप्रामाणिकपणा.

सिब्बल यांची मागणी आहे की, शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तत्कालीन उपाध्यक्ष झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली व्हावा. विशेष म्हणजे सिब्बलांच्या या युक्तिवादावर सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली. तुमचं मान्य केलं तर आमदार अपात्र होतात. मात्र तो निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. आम्ही अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही. सुप्रीम कोर्ट मर्यादा ओलांडू शकत नाही असंही सरन्यायाधीश म्हणालेत.

सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे…पण कोर्टाला आमदारांना थेट अपात्र करण्याचा अधिकार आहे का ? आणि कोर्ट तसे आदेश देईल का ? यावरुन घटनातज्ज्ञांच्याही मनात सवाल आहे..

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधीमंडळातच होईल पण कोणाच्या अध्यक्षतेखाली ? तत्कालीन उपाध्यक्ष झिरवळ की आत्ताचे अध्यक्ष नार्वेकर निर्णय घेणार, हे कोर्टालाच ठरवावं लागेल

सलग 2 दिवस ठाकरे गटाकडून सिब्बलांनी युक्तिवाद केलाय…आता शिंदेंच्या शिवसेनेकडून महेश जेठमलानी आणि नीरज कौल युक्तिवाद करुन सिब्बलांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करतील

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.