AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनियंत्रीत इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, अपघातानंतर जे घडले ते भयानक

अनियंत्रित कार रस्ता दुभाजकाला तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर आदळली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले.

अनियंत्रीत इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, अपघातानंतर जे घडले ते भयानक
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2023 | 10:50 PM
Share

रवी खरात, प्रतिनिधी, नवी मुंबई : अनियंत्रित कार रस्ता दुभाजकाला तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर आदळली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. अपघातानंतर इनोव्हाचा चालक पसार झाला. पनवेलजवळील गव्हाण फाटा येथे उरणकडून पनवेलच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा चालकाचे नियंत्रण सुटले. त्याची कार दुसऱ्या ब्रेझा कारला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला. असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बेलापूर येथील अपोलो तसेच कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कार रस्ता दुभाजकाला तोडून गेलीpanvel 1 n

इन्होवा गाडी क्रमांक एम एच ४३ ए डब्लू २४३० वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन उरण येथून पनवेलच्या दिशेने भरधाव जात होता. त्याची गाडी गव्हाण फाटा येथे आली असताना इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्तादुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेले.

इन्होवा चालक गाडी सोडून पसार

पनवेल येथून उरणच्या दिशेने जाणाऱ्या ब्रेझा गाडी क्रमांक एम एच ४३ सी. सी. ८३७३ या कार वर धडकली. या अपघातात ब्रेझा कारमधील नारायण थोटे वय ७१ राहणार कोपरखैरणे हे गंभीररित्या जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. इतर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर इन्होवा चालक गाडी सोडून पसार झाला आहे.

दोन्ही वाहनांचे नुकसान

या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद दाभाडे , पोहवा हनुमंत आहिरे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी त्वरित रवाना झाले. अपघातग्रस्त वाहनांना एका बाजूस केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ