मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे यांचा यू टर्न, आधीच्या मागणीनंतर आता म्हटले….

Uddhav Thackeray: आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होऊ द्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस दखल घेत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मागणीवरुन यू टर्न घेतल्याचे दिसून येत आहेत.

मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे यांचा यू टर्न, आधीच्या मागणीनंतर आता म्हटले....
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 13, 2024 | 2:02 PM

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावेळी शरद पवार आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधी जाहीर करणार? त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली. आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होऊ द्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस दखल घेत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मागणीवरुन यू टर्न घेतल्याचे दिसून येत आहेत.

आधी सत्ताधाऱ्यांना चेहरा जाहीर करु द्या

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या. भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. गद्दार आणि चोरांचा चेहरा मानत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लढत आहेत. ही निवडणुक महाविकास आघाडी आणि महायुती होणार आहे. आमच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अपेक्षित करत आहेत. ते सत्ताधारी आहे. त्यांनी त्यांचा चेहरा जाहीर करू द्या. आमचा आम्ही लगेच करू.

शरद पवार म्हणतात, उद्धव यांचा वक्तव्य तेच आमचे वक्तव्य

मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला. आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे. नाना पटोले यांनीही त्याचे उत्तर असल्याचे सांगितले.

एकमताने मुख्यमंत्री ठरवू

आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मोदी आणि शाह यांचा विचार अंमलात आणणार आहोत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे. त्यांनी महिन्याभरात २७८ निर्णय घेतले. अनेक महामंडळं जाहीर केले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यातील एक तरी महामंडळ सुरू आहे का, एकाला तरी निधी दिली का हे तपासलं पाहिजे.