Uddhav Thackeray : मुख्यमंत्री बॅक इन ॲक्शन, उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्याला हजेरी, अडीच महिन्यात काय घडलं?

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री बॅक इन ॲक्शन, उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्याला हजेरी, अडीच महिन्यात काय घडलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर उपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 26, 2022 | 10:28 AM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. वर्षा या निवासस्थानातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते जवळपास 2 महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना हात दाखवला ,यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गळ्याभोवती पट्टा होता. मुख्यमंत्री यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे देखील गाडीत होते.

Uddhav Thackeray at Republic day

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात

उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन बैठका आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम सुरु केलं होतं. वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क इथं होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिले आहेत. अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दुसऱ्यांना देण्याची मागणी करणाऱ्या भाजपकडून स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशी भूमिका मांडली होती.विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना आम्ही राज्याचे प्रश्न सुटावेत म्हणून मुख्यमंत्री कुठं आहेत हे विचारत होतो. ते प्रश्न म्हणजे टीका नव्हती, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. केवळ एका पक्षाचे प्रमुख नाहीत. त्यांनी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची जबाबदारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना स्वीकारली आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न उपस्थित करायचे असल्यानं आणि त्यावर निर्णय व्हावेत या भावनेतून मुख्यमंत्री जर विधानभवानात येऊ शकत नसतील तर चार्ज दुसऱ्यांना द्यावा, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिवतीर्थावर उपस्थित आहेत. ते बॅक इन अ‌ॅक्शन आहेत. यापूर्वी ते ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाला हजर होते. पुढील काळात सर्वत्र ते बॅक इन अ‌ॅक्शन दिसतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या :

चर्चा तर होणारचः मालेगावमध्ये काँग्रेसला पाडलेल्या खिंडारानंतर भुजबळ हसून म्हणतायत की…!

वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Uddhav Thackeray attend Republic Day Function at Shivaji Park with Governor Bhagatsingh Koshyari

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें