
Uddhav Thackeray on BJP: शिवसेना फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. त्यांनी भाजपवर याप्रकरणी तोंडसुख घेतले. टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. त्यावेळी शिवसेना, फूट आणि भाजप या विषयावर त्यांनी सुरुवातीलाच ठाकरी बाणा दाखवला. त्यांनी यावेळी भाजपवर जहरी टीका केली. शिंदे सेना ही मराठी मतं फोडण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच केला. मुंबई महापालिका निवडणुकीत या मुद्यावर प्रचार होत असल्याचे प्रकर्षणाने समोर येत आहे.
त्यांना मुंबईवर कब्जा करायचाय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना एकच आहे आणि ठाकरे यांचीच शिवसेना आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही शिंदे सेना असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी माणसांची मतं फोडण्यासाठी ही शिंदे सेना तयार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. शिंदे सेना ही नाहीच आहे ती मिंधे सेना आहे. ती एसएनसी गट आहे. ती भाजपची बी टीम आहे. मराठी मत फोडायला ही सेना तयार करण्यात आली आहे. मराठी मतं फोडून मुंबईवर कब्जा करण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
हीच भाजपची कपटनीती
शिवसेनेचे बोट धरून भाजप राज्यात मोठी झाली. शिंदेसेनेच्या माध्यमातून भाजपने धनुष्यबाण चोरला. त्यांना असं वाटतंय की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली.नाव चोरले, माझे वडिल चोरले, निशाणी चोरली. ही शाहांची घाणेरडी नीती आहे. ही चाणक्य नीती नाही. ही कपटनीती आहे, असा जहरी टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
निवडणुकाच झाली नाही तर निवडून कशा झाल्या. काय दुखतं त्यांचं त्यांना कळत नाही. तुम्ही मतदारांचा अधिकार हिरावून घेतला. हे लोकशाहीचे मोठं पाप आहे. शाह सेनेच्या माणसाला १ कोटीची ऑफर दिली. नार्वेकर ऑन द स्पॉट गेले. हरिभाऊ राठोड यांचं संरक्षण ताबडतोब काढलं. तुम्ही काय अनिल कपूर झाले का नायकचे. आम्ही मिरची लावल्यावर काय होईल ते पाहा. आम्ही मिरच्या लावल्या तर यांना कुठे कुठे झाकावं लागेल ते पाहा. या निवडणुकीत जेन झी पहिल्या प्रथम मतदान केलं असतं. तुमच्या बाजूने केलं असतं तर निवडून या ना. निवडणूक आली तर आपको क्यों मिर्ची लगी. तुम्ही का घाबरता. मीही बिनविरोध आलो. पण माझ्या विरोधात उमेदवार नव्हता. वन नेशन वन इलेक्शनसाठी हे करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.