AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट-वंचितची युती अंतिम टप्प्यात, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक

आधी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची दोन तास बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचीही बैठक झाली.

ठाकरे गट-वंचितची युती अंतिम टप्प्यात, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक
उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर
| Updated on: Dec 05, 2022 | 10:07 PM
Share

मुंबई : मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये दोन तास उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत चौथा पक्ष म्हणून विषय मांडा, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. शिवसेनेला कळविलं की, आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार आहे, असं वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे व्यतिरिक्त विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते.

या युतीसंदर्भात शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कुणी कुणाबरोबर यावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याचा कुठलाही परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होणार नाही. अनेक दलित संघटना आमच्याबरोबर यायला तयार आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणतेही मतं कुणाची जहागीर नाही. ज्याला वाटतं हा पक्ष आमच्या हिताचा आहे त्यांना मतदान होतं. मागासवर्गिय मतं कुणाला जाणार, असं कुणी सांगत असेल, तर तसं होत नाही. मतदार कुणाच्या सांगण्यावर जात नाही. जनतेची काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे मत येतात.

आधी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची दोन तास बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचीही बैठक झाली. अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचा नेमका रोल काय असेल, याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. त्यामुळं या तीन पक्षात चौथा पक्ष म्हणून वंचित आघाडी येणार की, ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....