AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी! निवडणुकीआधीच निकाल आला, भाजपचे 8 उमेदवार विजयी, जल्लोषाला सुरुवात

ZP Election : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजपचे आतापर्यंत 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी! निवडणुकीआधीच निकाल आला, भाजपचे 8 उमेदवार विजयी, जल्लोषाला सुरुवात
BJP 8 Candidate WonImage Credit source: Google
| Updated on: Jan 24, 2026 | 5:52 PM
Share

राज्यात सध्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. आता 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज माघार घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आतापर्यंत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कणकवली पंचायत समिती आणि देवगड पंचायत समितीतील हे उमेदवार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत खारेपाटण गटातील उमेदवार प्राची इस्वालकर(भाजप), बांदा गटातील उमेदवार प्रमोद कामत (भाजप), पडेल गटातील उमेदवार सुयोगी रविंद्र घाडी (भाजप) बापर्डे गटातील उमेदवार अवनी अमोल तेली (भाजप) जाणवली गटातील उमेदवार रुहिता राजेश तांबे (शिवसेना) हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्वांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे.

पंचायत समितीतही अनेक उमेदवारांची माघार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपचे काही सदस्य बिनविरोध झाले आहेत. वरवडे पंचायत समितीत भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. वरवडे पंचायत समितीमध्ये सुरुवातीला तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र ठाकरे गटाचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साधे यांनी माघार घेतल्यामुळे एकमेव उमेदवार म्हणून सोनू सावंत यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत.

बिनविरोध उमेदवारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

देवगड तालुक्यातील पडेल पंचायत समितीत भाजपचे अंकुश यशवंत ठूकरूल, नाडण पंचायत समितीत भाजपचे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बापर्डे पंचायत समितीत भाजपच्या संजना संजय लाड याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे अलिकडेच पार पडलेल्या महानगर पालिकेप्रमाणे यावेळीही भाजपने बिनविरोध पॅटर्न राबविल्याचे दिसत आहे. 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख असल्यामुळे अजूनही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध)

  1. खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वालकर(भाजप)
  2. बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
  3. जाणवली जि. प. उमेदवार; रुहिता राजेश तांबे ( भाजपची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
  4. पडेल – जिल्हा परिषद;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
  5. बापर्डे – जिल्हा परिषद ;अवनी अमोल तेली (भाजप)

पंचायत समिती कणकवली (बिनविरोध)

  1. वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)

देवगड तालुक्यातील पंचायत समिती(बिनविरोध)

  1. पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
  2. नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
  3. बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....