AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आवाज मराठीचा घुमणार, 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर; सध्या मुंबईतील परिस्थिती काय?

उद्धव आणि राज ठाकरे यांचा संयुक्त मेळावा ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी डोममध्ये भरला जाणार आहे. त्रिभाषा सूत्रावरील निर्णयाच्या निषेधार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा हा या मेळाव्याचा केंद्रबिंदू आहे.

आवाज मराठीचा घुमणार, 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर; सध्या मुंबईतील परिस्थिती काय?
Updated on: Jul 05, 2025 | 10:34 AM
Share

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होता आहे. आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत जनतेला या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात ‘आवाज मराठीचा’ असा संदेश देत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

या मेळाव्यासाठी व्यासपीठ, एलईडी लाईट, एलईडी स्क्रीन, कार्यकर्त्यांची आसन व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वरळीतील डोम सभागृहातील व्यासपीठावर महाराष्ट्राचा नकाशा पाहायला मिळत आहे. तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खास आसन व्यवस्था आणि स्क्रीनही लावण्यात आले आहे. या मेळाव्याला केवळ मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत.

कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात सहभागी होणार

तसेच ठाकरे आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र घोषणाबाजी करत मेळाव्यात सहभागी होताना दिसत आहेत. ठाण्यातील ठाणे नगर भागातही मराठी एकजुटीचा नारा देत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पुण्यातील कात्रजमधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे कार्यकर्त्यांसह मेळाव्यासाठी निघाले आहेत. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी आणि प्रवक्ते हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते पारंपरिक पोशाखात आणि कोळी बँडसह ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कांदिवलीहून ट्रेनने निघाले आहेत. तर कल्याणहून मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात मुंबईतील विजयी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांना आणि मराठी प्रेमींनी एकत्र येता येईल. तसेच या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी प्रेमी, साहित्यकार, लेखक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

वरळीतील डोममध्ये जय्यत तयारी

  • ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी आयोजित केलेल्या डोम या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ सहभागी पक्षांचे अध्यक्ष, प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
  • वरळी डोममध्ये जवळपास ७ ते ८ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • डोमच्या हॉलमध्ये, बाहेर आणि रस्त्यावरही एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून अधिक लोक मेळावा पाहू शकतील.
  • वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये ८०० गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
  • वरळी डोमसमोर तटीय रस्त्याच्या पुलाखाली दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • महालक्ष्मी रेसकोर्स येथे बसेस आणि बाहेरून येणाऱ्या मोठ्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

राजकीय समीकरणे आणि आगामी महानगरपालिका निवडणुका

गेल्या २० वर्षांत उद्धव आणि राज ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणूक या दोन्ही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून या एकजुटीला “मराठीसाठी नव्हे, तर महानगरपालिका निवडणुकीसाठी” असे म्हटले जात आहे.

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्...
राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला
राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला.
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या.
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.