पराभव जिव्हारी लागलाय… वचपा काढणारच; उद्धव ठाकरे कडाडले; शिवसैनिकांच्या साथीने घेतली भीष्म प्रतिज्ञा

ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत 21 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यापैकी केवळ 9 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जिंकले. तर 12 जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. हा पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज पराभवाचा वचपा काढण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली.

पराभव जिव्हारी लागलाय... वचपा काढणारच; उद्धव ठाकरे कडाडले; शिवसैनिकांच्या साथीने घेतली भीष्म प्रतिज्ञा
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 9:19 PM

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून आज मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. देशात नुकतंच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ठाकरे गटाचे महाराष्ट्रात 9 खासदार जिंकून आले. तर काही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. ठाकरे गटाच्या उमेदवारांचा झालेला पराभव हा उद्धव ठाकरे यांना प्रचंड जिव्हारी लागला आहे. या पराभवाचा आपण वचपा काढणारच, अशी भीष्म प्रतिज्ञा उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पराभवाचा बदला घ्यायचा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काही योद्धे आपले पराभूत झाले. जगाने दाखवून दिलं भाजप अजिंक्य नाही. मोदी अजिंक्य नाही. मोदींचे पाय मातीचेच आहे हे इतिहासात लिहिलं जाईल. खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ ही नावे घेतल्यावर आपण काय म्हणतो. किती वर्ष झाली. यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांचाही पुसणार नाही. इतिहासात गद्दार की योद्धा म्हणून नोंदवलं पाहिजे,. मी हिंमत हारणार नाही. काही हारजीत होत असते. निवडणूक हरलो तर उद्या जिंकेल. पण हिंमत हरलो तर जिंकू शकणार नाही. हिंमत हरणार नाही. तुम्हाला हरू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असले. जिव्हारी लागला पराभव पण त्या पराभवाचा वचपा विजय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले.

ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

“पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा. वाजवले की बारा आता जाऊ द्या ना. ते म्हणतात नाही, और सत्यानाश करो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. काही झालं तर जबाबदारी घ्यायची ताकद नाही असं सरकार चाललं आहे. पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत. आपल्याला विजय पाहिजे. मुंबईत आणि नाशिकमध्ये. लढाई लढायची आहे. लढाई सुरू झाली आहे. ११ विधान परिषदेच्या जागांची निवडणूक सुरू झाली आहे. आमदार ते निवडून देणार आहेत. कोर्टाला विनंती आहे. ही निवडणूक होईल का? अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक कशी होऊ शकते? निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असं म्हणतील ही प्रक्रिया सुरूच कशी झाली? अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

‘तीच मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावली’

“मी नम्र आहे. तुम्ही प्रेमाने वागा प्रेमाने वागू. तुम्ही पाठित वार कराल तर वाघनखं काढू. मुनगंटीवार यांची नखे उपटले चंद्रपुरात. ते लंडनला वाघनखं आणायला चालले. कशाला छत्रपतींचा अपमान करता. भगव्यांशी बदनामी करणारी औलाद तुम्ही. आपल्या भगव्या झेंड्यावर आपलं चिन्ह टाकायचं नाही. तो शिवरायाचा भगवा आहे . तो पवित्रच राहिला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा केला. छत्रपतीच्या भगव्याला कलंक लावण्याचं काम त्यांनी केलं आहे. आपला भगवा भगवाच असला पाहिजे. एक आपला भगवा दिसल्यानंतर कुणाचा भगवा. हा शिवाजी महाराजांचा भगवा. वारकऱ्यांचा भगवा आहे. महाराष्ट्राचा भगवा आहे. भगाव हा भगवा आहे. मशालीशी साधर्म्य दिसणार आहे. तीच मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावली आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Non Stop LIVE Update
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.