AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांच्या नकलेवर उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मी बाहेर पडलो तरी…

या तिन्ही शक्तींपैकी कर्तबगार महिला किंवा पुरुष मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे.

राज ठाकरे यांच्या नकलेवर उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मी बाहेर पडलो तरी...
उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 30, 2022 | 8:11 PM
Share

मुंबई – वांद्रे येथील लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची यावं. पण मागणी कोण करणार असा सवालही त्यांनी केला. यांना तर शिवाजी महाराजही जुनं आदर्श वाटायला लागले आहेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. मुंबईतला एका मंत्री झालाय. आजच्या गद्दारांची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेसोबत केली. हा तर कहरच झाला. काय बोलायचं ते कळतंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुठं आग्रा कुठं. त्यांच्या सुटकेसाठी काय भाजपनं मदत केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले नसते तर आजचे तुलना करणारे कुठंतरी कुर्निसात घालत बसले असते, असंही ते म्हणाले.

जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी असा आदर्श शिवाजी महाराज यांनी निर्माण केला. आता देश मेला तर चालेल. जगेन तर सत्तेसाठी, असं सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला. खरं तर देश माझ्यासाठी मोठा असला पाहिजे. पक्ष हा नंतरचा भाग आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळी वाट दाखविली. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येतेय. मला शिवाजी पार्कवर झाला तसा मेळावा लवकर घ्यायचा आहे.

महाराष्ट्राची ताकद म्हणजे ही एकवटते आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो. ही ताकद म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती आण लहुशक्ती आहे.

या तिन्ही शक्तींचा कर्तबगार महिला किंवा पुरुष मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे. हे स्वप्न स्वप्न न ठेवता सत्त्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला सोबत घेऊन ही विचारांची मशाल वाड्या, वस्त्यात घेऊन जावं लागेल. असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

अंधकार दूर करणारी मशाल आपल्याला घेऊन जावं लागेल. ब्रेक के बाद. आता पुन्हा नव्या दमानं नव्या जोमानं एकजुटीनं सामोरं जावं लागेल, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दिला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.