ठाणे : ठाण्यामधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडलं. चार मिनिटांच्या भाषणातून त्यांनी शिंदे यांच्यावर तीक्ष्ण शब्दात वार केलेत. महाआरोग्य शिबिरानिमित्त उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या शिबिरातून विकाऊ आणि लांडगे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.