
5 जुलै रोजी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत एकाच मंचावर दिसले. तर काल परवा पावसाळी अधिवेशनात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे? अशी उत्सुकता अनेकांच्या मनात चाळवली. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी अनेकांच्या मनातील शंका, प्रश्नांना उत्तरं दिली. खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.
फोडाफोडीवर ‘रोखठोक’
देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने सध्या कळस गाठला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी तोंडसूख घेतले. जंगली प्राणी हिंस्त्र नाही. हिंस्र राजकारणी असतात. जंगलात कोणी कुणावर विनाकारण हल्ला करत नाही. भूक लागल्याशिवाय ते हल्ला करत नाही. वाघ भूकेपूरतीच शिकार करतो. उगाच प्राणी मारत फ्रिजमध्ये ठेवत नाही. सत्ता मिळाली तर आमदार घ्या आणि खासदार घ्या असं करत नाही. कारण त्यांच्याकडे फ्रिज नाही. एक हरण मारलं म्हणून उद्यासाठी दुसरं हरण मारू असं प्राणी करत नाहीत. हे राजकारणी आमदारांना फोडतात आणि सत्तेच्या शीत कपाटात थंड करून ठेवतात, अशी चपराक त्यांनी लगावली.
शिंदे गटावर तोंडसूख
काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडा अवधी द्यावा लागतो. नवीन झरा यावा लागतो. एखाद्यावेळी भावनेच्या भरात आणि प्रेमामुळे आपण करत नाही. कारण माणूस अयोग्य आहे. स्वतहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो. त्यामुळे वाटतं बरं वाटतं. अरे हे गेला. आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहता. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना. जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पाडतात कळतात, असे तोंडसूख त्यांनी घेतले.
आदानींवर पुन्हा बरसले
सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता. जो माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं. ज्यांना काही ओळख नव्हती, त्यांना मोठं केलं. पण ज्यांनी मोठं केलं ती लोकं आजही माझ्यासोबत आहे. ही शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही.
शिवसेना जमिनीचा दोस्त आहे. म्हणून शिवसेना संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळं खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली, अशी चपराक त्यांनी अदानींचे नाव न घेता सरकारला दिली. तुम्ही शत्रू आहात. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.