Ujjawal Nikam: माफीचा साक्षीदार…पवनराजे खून खटल्यात उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य… तर आला असता मोठा ट्विस्ट?
Ujjawal Nikam on Pavanraje Nimbalkar Murder Case: हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर खून खटल्यात पुराव्याअभावी मुंबई सत्र न्यायालयाने पद्यसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदारानं वारंवार जबाब बदलला हे महत्त्वाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. या खटल्यावर विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी मोठे भाष्य केले आहे.

Ujjawal Nikam on Pavanraje Nimbalkar Murder Case: राजकीयदृष्ट्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर खून खटल्यात पुराव्याअभावी पद्यसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदारानं वारंवार जबाब बदलला हे महत्त्वाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. या खटल्यातील निकालानंतर विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी मोठे भाष्य केले आहे. या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदारावरती न्यायालयाने विश्वास ठेवला नाही, असे सकृत दर्शन दिसते. कायद्यानुसार भक्कम पुरावा लागतो. पण याचा अर्थ असा आहे की सरकारी पक्षाची कुठं चुक झाली का? की पुरावे व्यवस्थित नव्हते. संपूर्ण खटल्याचे निकालपत्र वाचल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचं मूल्यमापन करता येईल, असे निकम म्हणाले.
सीबीआयच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाची नाराजी
सीबीआयच्या कार्यपद्धतीवरती सीबीआयने नेमकी काय टीका केली, हे बघायला हवे. मी यापूर्वी सीबीआयसोबत काम केलेले आहे. सीबीआयचे एक वैशिष्ट्ये असे आहे की, प्रत्येक गोष्टीत त्यांना दिल्लीची परवानगी लागते. राज्य पोलिसांकडे अशी पद्धत नाही. सीबीआयचे महत्त्व अजूनही चांगले आहे. तरीही या खटल्यात दोषींची निर्दोष सुटका होते, याचाच अर्थ तपासात काही उणिवा राहिल्या आहेत का, राहिल्या असतील तर त्या कोणत्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. सीबीआय प्रिमियम तपास यंत्रणा आहे. सीबीआयवर जर न्यायायलयाने टिप्पणी केली असेल तर ती सीबीआयने गांभीर्याने घ्यायला हवी. भविष्यकाळात सीबीआयने विश्वासाला पात्र असायला हवे, अशी अपेक्षा या खटल्याच्या निमित्ताने उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
माफीचा साक्षीदाराविषयी मोठे भाष्य
माफीचा साक्षीदार हा खोटं बोलतो की खरं बोलतो हा पहिला अधिकार सरकारी वकिलांचा आहे. सरकारी वकिलाला जर माफीचा साक्षीदार खोटं बोलतो असे वाटत असेल तर तो ती साक्ष रद्द करू शकतो. गुलशन कुमार खून खटल्यात माफीचा साक्षीदार उलटला होता. त्यामुळे मी त्याची माफी रद्द केली होती. तो अधिकार सरकारी वकिलाला आहे, न्यायालयाला नाही. या खटल्यात सरकारी वकिलाने माफीच्या साक्षीदाराची माफी संबंधित वकिलाने रद्द केली का, हे पाहावे लागेल. माफीचा साक्षीदार ही संवेदनशील बाब आहे. संबंधित सरकारी वकिलाने त्याविषयी काय काळजी घेतली हे पाहावे लागेल. माफीचा साक्षीदार हा स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इतरांना गोवत असतो.त्यामुळे माफीच्या साक्षीदाराची साक्ष न्यायालय विचारात घेताना त्यासाठी पुष्टीदायक पुरावा तपासला जातो. या खटल्यात तसं झालेले दिसत नाही, असे मोठे भाष्य विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.