AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकरांचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या ‘कोर्टात’; काय निर्णय घेणार? अनिल देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला

Omraje Nimbalkar- Uddhav Thackeray: पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा निकालाचा मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर यांना बसला आहे. तर या निकालाने बंडखोर खासदारांच्या काळजात धस्स झाले आहे. तर आता ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेणार याविषयी ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी मोठे संकेत दिले आहेत.

ओमराजे निंबाळकरांचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या 'कोर्टात'; काय निर्णय घेणार? अनिल देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला
ओमराजे निंबाळकरांचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या 'कोर्टात'Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 20, 2026 | 2:12 PM
Share

Omraje Nimbalkar- Uddhav Thackeray Operation Tiger : पवनराजे निंबाळकर खून खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपी निर्दोष सुटले. या निकालाचा मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर यांना बसला. तर निकाल समोर येताच बंडखोर खासदारांच्या काळजात धस्स झाले आहे. आता मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. तर ओमराजेंविषयी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याविषयी ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी मोठे संकेत दिले आहेत.

निंबाळकरांचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात

ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी खटल्याचा निकाल समोर येताच मोठी प्रतिक्रिया दिली. हा निकाल ओमराजेंना नाराज करणार असल्याचे आणि कसे लोक असतात हे त्यांना आता कळले असेल असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना पक्षात पुन्हा यायचं असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावं. उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पण त्यांनी पक्षाची शिस्त मोड केली आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी बहिष्कार टाकला होता. ते आलेच नव्हते. त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे, असे स्पष्ट केले. देसाई यांनी याप्रकरणी मोठे संकेत दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात हा निंबाळकरांचा निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

फुटीर खासदारांच्या काळजात धस्स

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समर्थकांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी फुटीर खासदारांना एकाची अत्यंत गरज आहे. तर आता ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. फुटीर खासदारांसमोर आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. पण त्याचवेळी ऑपरेशन टायगर आताच धोक्यात आलेले आहे असे म्हणणे घाईचे ठरेल असे अनेकांचे मत आहे. ओमराजे निंबाळकर यांची भूमिका काय असेल यावर सर्व अवलंबून असेल. उद्या ते त्यांची भूमिका कदाचित जाहीर करू शकतील. ओमराजे निंबाळकरांची भूमिका या संपूर्ण प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी