Unmesh Joshi | ईडीच्या नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे : उन्मेष जोशी

नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे, प्रश्न असतील त्याची उत्तरं देऊ, कागदपत्र मागितली की ती देऊ. मनी लाँड्रिंगमध्ये कोणतंही तथ्य नाही. 2008 चा तो व्यवहार आहे. आता 10 वर्ष झाली, असं उन्मेष जोशी यांनी नमूद केलं.

Unmesh Joshi | ईडीच्या नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे : उन्मेष जोशी
Follow us
| Updated on: Aug 19, 2019 | 12:49 PM

मुंबई : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. उन्मेष जोशींना आज तर राज ठाकरे यांनी येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उन्मेष जोशी हे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी टीव्ही 9 मराठीने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. उन्मेष जोशी म्हणाले, “ईडीची नोटीस मला आली आहे. या नोटीसमध्ये नेमका कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. मी  उद्योगपती आहे. कोहिनूर मिल व्यवहार बद्दल विचारत आहात ते 10 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे.”

“नोटीसमध्ये कोणतेही आरोप नाहीत, ईडीने फक्त भेटायला बोलावलं आहे. काय प्रश्न आहे ते बघून उत्तरं देऊ. नोटीसमध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे माहित नाही, ईडीला माहित असेल. भेटायला बोलावलं आहे, काय आहे ते बघू. नोटीसमध्ये राज ठाकरे आणि माझं नाव आहे हे फक्त वर्तमानपत्रामध्ये कळलं, नोटीसमध्ये नावं नाहीत”, असंही उन्मेष जोशी म्हणाले.

नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे, प्रश्न असतील त्याची उत्तरं देऊ, कागदपत्र मागितली की ती देऊ. मनी लाँड्रिंगमध्ये कोणतंही तथ्य नाही. 2008 चा तो व्यवहार आहे. आता 10 वर्ष झाली, असं उन्मेष जोशी यांनी नमूद केलं.

कोहिनूर स्क्वेअर टॉवर

कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका होती, यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.