AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसं तुमचं… राज ठाकरे यांचा यूपीएससीच्या यशवंतांना कानमंत्र

आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसं तुमचं... राज ठाकरे यांचा यूपीएससीच्या यशवंतांना कानमंत्र
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2023 | 1:00 PM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे. तसं तुमचं महाराष्ट्रावर असलं पाहिजे. गुजरातमध्ये अनेक गोष्टी आल्या पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. ते वाटणं चुकीचं नाही. स्वाभाविक आहे. मोदींचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसाच तुमच्या मनातूनही महाराष्ट्र जाता कामा नये, असा कानमंत्र मनसे नेते राज ठाकरे यांनी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला. यूपीएससीत यश मिळवलेल्या तरुणांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला.

आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा. एक आयएएस अधिकारी मंत्रालयाबाहेर उभा राहुन मुख्यमंत्र्यांना जोरजोरात शिव्या देत असतो. त्यावेळी इतर लोकांनी विचारलं तुला भीती वाटतं नाही का? तर त्यावर त्याने उत्तर दिलं मुख्यमंत्री टेंपरेरी असतो मी पर्मनंट आहे, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. त्यावेळी एकच हशा पिकला.

राज्यावर प्रेम ठेवा

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनी महाराष्ट्रात आपला प्रकल्प व्हावा यासाठी आली होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांना काही कारणास्तव मीटिंगसाठी उपस्थित राहणे शक्य नव्हतं. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बैठकीसाठी पाठवले. तो अधिकारी साऊथ इंडियन होता. त्याने सुरुवातीपासूनच कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर नन्नाचा पाढा लावला आणि प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही.

कंपनी नाराज झाल्यानंतर त्याने तात्काळ आपल्या राज्यातील मित्राला फोन करून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आणि संबंधित प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेल्याचा पाहायला मिळालं. अधिकारी म्हणून कुठेही काम करा. परंतु आपल्या राज्याबाबत प्रेम असू द्या, असंही त्यांनी सांगितलं.

यालाच लोकशाही म्हणतात

आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला 42 टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. तुमचा सत्कार करत आहे. यालाच लोकशाही म्हणतात, अशी मिश्किल कोटीही राज यांनी केली.

मातीला विसरू नका

देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करा, पण आपल्या मातीला, महाराष्ट्राला विसरू नका. तुमच्या मनातून महाराष्ट्र कधीच जाऊ देऊ नका, असा मोलाचा मंत्रही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी ओळख करून घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?