AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishali Thakkar: मृत्यूनंतर वैशालीची शेवटची इच्छा कुटुंबीयांनी केली पूर्ण, काय होती शेवटची इच्छा?

वैशाली ठक्करच्या आत्महत्त्येने चित्रपट सुष्टीत शोककळा पसरली आहे. वैशालीने मृत्यूपूर्वी तिची अंतिम इच्छा बोलून दाखविली होती.

Vaishali Thakkar: मृत्यूनंतर वैशालीची शेवटची इच्छा कुटुंबीयांनी केली पूर्ण, काय होती शेवटची इच्छा?
वैशाली ठक्कर Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 3:37 PM
Share

मुंबई,   वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) यांच्या निधनाने अभिनेत्रीच्या कुटुंबासह संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी वैशालीने आत्महत्या (Suicide) करून जीव दिला. नेहमी हसत-खेळत राहणारी वैशाली खूप संकटात सापडली आणि शेवटी आत्महत्या करीत आयुष्याची लढाई हरली. अनेक टीव्ही मालिकेत तिच्या अभिनयाने ती घराघरात लोकप्रिय झाली होती. वैशाली सगळ्यांची लाडकी होती. आता तिच्या चुलत भावाने वैशालीबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे की, ऐकून तुम्हीही वैशालीचे नक्कीच कौतुक कराल. वैशालीच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार ती अनेकदा म्हणायची की मृत्यूनंतर तिला डोळे दान करायचे आहेत. ही गोष्ट वैशालीने तिच्या आईलाही अनेकदा सांगितली होती.  दृष्टीहिनाला तिच्या सुंदर डोळ्यांनी हे जग पाहता यावे यासाठी वैशालीच्या कुटुंबीयांनी रविवारी  अंत्यसंस्काराच्या आधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वैशालीचे डोळे दान केले आहेत.

वैशालीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा

वयाच्या 30 व्या वर्षी वैशालीने आपले जीवन संपवले. पण जातानाही तिने कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश भरला. यावरून ती किती चांगल्या मनाची होती हे दिसून येते. वैशालीचे 20 ऑक्टोबरला लग्न होणार होते. तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. वैशालीच्या घरात आनंदाचे दार ठोठावणार होते, पण लग्नाच्या सनईपूर्वीच वैशालीच्या घरात तिच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. वैशालीच्या मृत्यूने अभिनेत्रीचे कुटुंब हादरले आहे. तिच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.

एका तरुण मुलीच्या मृत्यूमुळे वैशालीचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, आरोपीला शिक्षा व्हावी अशी कुटुंबीयांची इच्छा आहे. राहुल वैशालीचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. तिला धमकवायचा. राहुलच्या जाचाला कंटाळूनच वैशालीने मृत्यूला कवटाळले असा कुटुंबीयांचा आरोप आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.