अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार

अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार

सासूने सूनेच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घालून हत्या केली, त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

अनिश बेंद्रे

|

Dec 15, 2019 | 6:41 PM

वसई : वसईत सासूने सुनेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर सासूने स्वत:च पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. सून झोपेत असताना सासूने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने सात ते आठ वेळा वार (Vasai Lady Kills Daughter in Law) केले. सुनेविषयीच्या द्वेषातून सासूने टोकाचं पाऊल उचललं.

32 वर्षीय सून रिया माने हिची 48 वर्षीय सासू आनंदी माने हिने हत्या केल्याचा आरोप आहे. माणिकपूर पोलिस ठाण्यात सासूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सासूला ताब्यात घेऊन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान सून आपल्या बेडरुममध्ये झोपली असताना तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने सात ते आठ वेळा वार करुन सासूने तिची निर्घृण हत्या केली. हत्या करुन सासू स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता रिया माने यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी सासूलाही ताब्यात घेतलं.

आणि साताऱ्यात मामा-भाची बुडतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला…

वसई पश्चिमेला ओमनगर मधील इस्कॉन हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर फ्लॅट नंबर 401 मध्ये उच्चशिक्षित माने कुटुंब राहते. दत्तात्रय माने हे वनविभागात नोकरीला होते. त्यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. मोठा मुलगा रोहनचा विवाह रियासोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. रोहन आणि रिया यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे. रोहन हा इंजिनिअर आहे, तर रिया नर्स होती.

रोहन आणि रिया 2013 पासून नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत होते. एक डिसेंबरला ते आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी वसईत आले होते. रोहनच्या लग्नापासूनच त्याची पत्नी रिया आई आनंदी मानेला आवडत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचे छोट्यामोठ्या कारणावरुन वादविवाद होत होते.

लग्नाच्या नंतर आपला मुलगा पत्नीच्या आहारी जाऊन आपल्यापासून दुरावला आहे, याचं दुःख आरोपी सासूच्या मनात खदखदत होती. दोन दिवसांपूर्वी रोहनची मुलगी घेण्यावरुन सासू-सुनेत किरकोळ वाद झाला होता. याचाही राग सासूच्या मनात होता. आज सकाळी रोहन, त्याचे वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन फिरायला गेले होते. घरात लहान मुलगा आणि त्याची पत्नी एका रुममध्ये, तर रोहनची पत्नी रिया ही दुसऱ्या रुममध्ये झोपलेली होती. याचीच संधी साधून आरोपी सासूने घरातील फ्लॉवर पॉट घेऊन झोपेत असलेल्या रियाच्या डोक्यात सात ते आठ सपासप वार केले आणि तिची जागीच हत्या केली.

हत्येनंतर सासूने स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. पण हत्येनंतर आपणही आत्महत्या करण्यासाठी काही गोळ्या खाल्ल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी तिचीही तात्काळ वैद्यकीय तपासणी केली. तर रियाही मृत्युमुखी पडल्याचं पोलिसांना आढळलं. सकाळच्या फेरफटक्यानंतर सासरे, पती यांना घरी आल्यावर ही घटना घडल्याचं समजलं. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नापासूनच सासु ही त्रास देत असल्याचा आरोप मयत सूनेच्या वडिलांनी (Vasai Lady Kills Daughter in Law) केला आहे. लग्नात सर्व काही देऊनही माझ्या मुलीला सासू त्रास देत होती, म्हणून तिला झोपेतच मारलं, असा आरोपही माहेरच्यांनी केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें