AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण

घाऊक बाजारात गाड्यांची आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात आज(बुधवार) घसरण पाहायला मिळाली. (Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Nov 04, 2020 | 7:48 PM
Share

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना सध्या भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढली आहे. आज मार्केटमध्ये एकूण 650 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. (Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार बघायला मिळत होते, मात्र आता बाजारात भाज्यांच्या दरात घसरण होत आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 650 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. सध्या बाजारात भेंडी 20 ते 30 रुपये, कोबी 30 ते 40 रुपये, मिरची 30 ते 40 रुपये, विकली जात असून टोमॅटो 25 ते 35, वांगी 30 ते 40 तर कोथिंबीर 10 ते 20 रुपये दराने विकली जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. पणजवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.

भाज्यांचे आजचे दर किती?

भेंडी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो कोबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो मिरची 30 ते 40 रुपये प्रतिकिलो टोमॅटो 25 ते 40 रुपये प्रतिकिलो वांगी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो कोथिंबीर 10 ते 20 रुपये प्रतिकिलो

(Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...