कोर्टाच्या निकालानंतर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया, नार्वेकर म्हणतात, कोर्टाच्या सूचनेनुसार लवकरच निर्णय घेणार

येणाऱ्या काळात योग्य ती सुनावणी घेऊ. त्यावर योग्य निर्णय घेऊ. योग्य वेळेत हा निर्णय घेणार असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

कोर्टाच्या निकालानंतर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया, नार्वेकर म्हणतात, कोर्टाच्या सूचनेनुसार लवकरच निर्णय घेणार
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 6:48 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावरील निकाल देताना काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हीप लागू होईल. याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. या निर्णयाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वागत केले. राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाले, संविधानातील कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराला न्यायालयाने मान्यता दिली आहे. याबद्दल मी या निकालाचे स्वागत करतो. संविधानातील १० शेड्यूल नुसार राजकीय पक्षाचे व्हीप लागू व्हायला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं. राजकीय पक्षातील कोणता गट योग्य यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

येणाऱ्या काळात सुनावणी घेऊ

येणाऱ्या काळात योग्य ती सुनावणी घेऊ. त्यावर योग्य निर्णय घेऊ. योग्य वेळेत हा निर्णय घेणार असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, राजकीय पक्ष कोणता योग्य आहे. त्यानंतर पिटीशनला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देऊ. सर्व नियमांचे पालन करून. घटनात्मक बाबीचा विचार करून निर्णय घेऊ. संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी असे निर्णय कामात येतील.

कोणावरही अन्याय होता कामा नये

राजकीय पक्ष मान्यताप्राप्त कोणता. त्यानंतर विरोधकांचं म्हणणं काय. पिटीशनवर घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. असं राहुल नार्वेकर म्हणाले. प्रत्येकाला वेळ दिला जाणार. बराच वेळ लागणार नाही. कारण यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. घाईघाईत निर्णय घेतला जाणार नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये, याचा विचार केला जाईल.

हे सुद्धा वाचा

योग्य वेळेत निर्णय घेऊ

घाई-घाईत निर्णय घेतल्यास अन्याय होऊ शकेल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. पण, जो वेळ लागायचा तो लागेल. योग्य वेळेत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं.

व्हीप हा एकच असू शकतो. राजकीय पक्षाचा व्हीप लागू होणार. कोणता पक्ष रिकग्नाईज आहे. व्हीप अपाइंट करण्याच्या पद्धतीनुसार व्हीप लागू केला जाईल, असंही नार्वकर यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.