सारखी ऑर्डर देते म्हणून वेटरचा परदेशी महिलेवर चाकूहल्ला

सारखी ऑर्डर देते म्हणून वेटरचा परदेशी महिलेवर चाकूहल्ला

मुंबई : एका हॉटेलमधील वेटरने परदेशी महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. ही महिला वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑर्डर देत असल्याने हा हल्ला वेटरने केला आहे. ही घटना 5 जानेवारीला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अंधेरीमधील कोशिया सुईट्स येथे घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. निशांत गौडा असं आरोपीचं नाव आहे.

अंधेरी जे. बी. नगर येथील कोशिया सुईटस हॉटेलमधील रुम नंबर 204  ही परदेशी महिला थांबली होती. आपल्या लग्नाची वर्षगाठ साजरी करण्यासाठी ही महिला साऊथ आफ्रिकेवरुन भारतात आली होती. यावेळी लग्नाची वर्षागाठ साजरी करत असताना अनेकजण जवळील मित्र पार्टीसाठी हजर झाले होते. तेव्हा कार्यक्रम सुरु असताना तिला अनेक गोष्टींची गरज लागली, तेव्हा तिने वेटरला सांगितले. सुरुवातीला तिने केक आणला होता, काही वेळाने तिने वेटरला प्लेट आणायला सांगितले, यानंतर पाण्याची बॉटल मागवली तसेच पुन्हा केक कापण्यासाठी चाकू मागितला होता. वारंवार ऑर्डर घेऊन वैतागलेल्या वेटरने थेट त्या परदेशी महिलेवर चाकुने हल्ला केला.

आरोपी वेटर निशांत गौडाला पोलिसांनी अटक केली असून, आज अंधेरी कोर्टात हजर केले होते. मात्र त्याला न्यायलयीन कोठडी पाठवण्यात आलं आहे. या झालेल्या सर्व प्रकरावर आम्ही हॉटेलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण हॉटेल मॅनेजर काही बोलण्यास तयार नव्हते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI