शेवटचा घटका मोजणार वालकस पूल अखेर कोसळला!

शेवटचा घटका मोजणार वालकस पूल अखेर कोसळला!
त्याआधी अर्धा तुटलेला पूल दगडांवर तग धरुन उभा होता, तरीही त्यावरुन ये-जा सुरु होती. रस्ता नसल्याने ग्रामस्थ नाईलाजाने जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहतूक करत होते. अखेर आज हा पूल कोसळला.

शहापूर: शेवटच्या घटका मोजत असलेला वालकस पूल अखेर आज सकाळी कोसळला. त्यामुळे वालकस बेहरे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

गेल्या 25 वर्षांपासून वालकस बेहरे ते खडवली रस्त्यासाठी झगडत असलेल्या गावकऱ्यांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत होता. खडवली वालकस बेहरे रस्ता शासनाच्या भोंगळ कारभारामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन भातसा नदीवरील अंतिम घटना मोजणाऱ्या पुलावरुन प्रवास करावा लागत होता. नाशिक महामार्गाला जोडणारा  हा रस्ता या पुलाने जोडला होता, तो पूल आज सकाळी कोसळला.

त्याआधी अर्धा तुटलेला पूल दगडांवर तग धरुन उभा होता, तरीही त्यावरुन ये-जा सुरु होती. रस्ता नसल्याने ग्रामस्थ नाईलाजाने जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहतूक करत होते. अखेर आज हा पूल कोसळला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI