मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 15 टक्के पाणीकपातीची घोषणा

| Updated on: Feb 18, 2020 | 7:22 AM

येत्या 24 तासांसाठी मुंबई 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार (Water shortage in Mumbai) आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 15 टक्के पाणीकपातीची घोषणा
Follow us on

मुंबई : येत्या 24 तासांसाठी मुंबई 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार (Water shortage in Mumbai) आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे मुंबई पूर्व उपनगरातील रहिवाशांना पुढच्या 24 तासांत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या पीसे आणि पांजरपोळ या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे पूर्व उपनगरात 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, असं मुंबई महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरात कुर्ला ते मुलुंड याठिकाणी 15 टक्के पाणी कपात असेल. त्यामध्ये चेंबूर आणि मानखुर्दचाही समावेश असणार आहे. पुढील 24 तासांसाठी ही पाणी कपात असेल, असं मुंबई महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयाने जाहीर केलं आहे.

आज (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही 15 टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या टी, एस, एन, एल, एम ईस्ट, एम वेस्ट यासारख्या विभागातील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार (Water shortage in Mumbai) आहे.