12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार: चंद्रकांत पाटील

| Updated on: Jul 06, 2021 | 3:54 PM

आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली आणि कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आली. (chandrakant patil)

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार: चंद्रकांत पाटील
chandrakant patil
Follow us on

मुंबई: आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली आणि कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आली, असं सांगतानाच आमच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. (we will move court against 12 MLAs suspension, says chandrakant patil)

12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आज विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी सरकारच्या निषेधाच्या ठरावावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली. शिवी भास्कर जाधव यांनीच दिली होती. पण आमच्या आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. खोटं कसं बोलावं हे या सरकारकडूनच शिकलं पाहिजे, असा टोला पाटील यांनी लगावला.

हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. हिंमत असेल तर गुप्त मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, असं आव्हानच त्यांनी दिलं. अजित पवार यांनी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाचं लॉलीपॉप दिल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार आम्हाला प्रतिविधानसभा भरू देत नव्हते, असंही ते म्हणाले. या सरकारने 23 हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवार-ठाकरे मुलांना पुढे नेणार, मग सामान्यांचे काय?

मराठा समाजाला भाजपने आरक्षण मिळवून दिलं. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. पवार साहेब सामान्य नागरिकांना आरक्षण हवं आहे. शाळा, महाविद्यालये तुमची आहेत. मग मराठा समाजाला प्रवेश का दिला जात नाही?, असा सवाल करतानाच तुम्ही तुमच्या मुलीला राजकारणात पुढे न्याल, उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला पुढे नेतील, पण सामान्य माणसांचे काय? असा सवालही त्यांनी केला. (we will move court against 12 MLAs suspension, says chandrakant patil)

 

संबंधित बातम्या:

12 आमदारांवरील निलंबनाची कारवाई कायदेशीरच, राज्यपालही काही करू शकत नाही: अ‍ॅड. असीम सरोदे

Monsoon Session Live Updates | विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता

VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण

(we will move court against 12 MLAs suspension, says chandrakant patil)