Monsoon Session Live Updates | परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 07, 2021 | 12:21 AM

आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणते प्रस्ताव सदनासमोर येतात. कोणते पारित होतात. सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगतो आणि भाजपच्या आमदारांवर केलेली कारवाई राहणार की सरकार मागे घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. | Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Day 2 6th July Live Update Mahavikas Aghadi Government BJP Shivsena

Monsoon Session Live Updates | परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे

राज्यात 5 आणि 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं. ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं. महाविकास आघाडीचे 12 आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी 12 आमदार निलंबित करुन घेतला, अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालीबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.

आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणते प्रस्ताव सदनासमोर येतात. कोणते पारित होतात. सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगतो आणि भाजपच्या आमदारांवर केलेली कारवाई राहणार की सरकार मागे घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. | Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Day 2 6th July Live Update Mahavikas Aghadi Government BJP Shivsena

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jul 2021 05:31 PM (IST)

    परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे

    राज्यपाल महोदयांनी मला पत्र पाठवलं होतं. त्यात तीन प्रश्न विचारले होते. त्यानंतर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी दिली. राज्य सरकार हे कोरोना नियम लावत नाही तर त्याचे पालनही करते. आरटीपीसीआरची चाचणी ही 72 तास ग्राह्य धऱली जाते. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा सर्व कार्यक्रम राज्यपालांना कळावावा लागतो. तो कळवल्यानंतर सर्व सदस्यांनाही ते सांगावे लागते. तारखेची मंजुरी मिळवल्यानंतर ज्या दिवशी  निवडणूक होणार असते त्याच्या एक दिवस आधीच्या मध्यान्हापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतो. त्यांतर दुसऱ्या दिवशी मतदान असते. या सर्व प्रक्रियेसाठी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यपालांना अध्यक्ष निवडीबाबत कळवलं आहे. ज्यामुळे कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा निवडणूक घेऊ

  • 06 Jul 2021 05:19 PM (IST)

    बोगस लसीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : उद्धव ठाकरे

    बोगस लसीकरण ज्यांनी केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. तसेच ज्यांना बोगस लस दिली त्यांचं रितसर लसीकरण केलं जाईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 06 Jul 2021 05:18 PM (IST)

    जनतेला समाधान मिळेल असं अधिवेशनात काम केलं : उद्धव ठाकरे

    दोन दिसांच्या अधिवेशनाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तुम्ही ऐकला. या दोन दिवसांमध्ये आम्ही जनतेला आनंदी तसेच समाधान देऊ असं काम केलं आहे. यावेळी सर्व विधानसभेत, विधानपरिषदेत जे सदस्य उपस्थित होते त्यांना धन्यवाद देतो. तसेच ज्या व्यक्तींकडून जे घडू नये ते घडले ते सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.

  • 06 Jul 2021 05:08 PM (IST)

    काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : उद्धव ठाकरे

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत आहेत. यावेळी बोलताना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल झालेल्या गोंधळावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी काल जे घडलं ते अतिशय लाजीरवाणं होतं, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. ही आपली संस्कती नाही. ही आपली परंपरा नाही, असे ठाकरे म्हणाले.

    विधिमंडाळातील कामकाजाचा दर्जा खालावण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न आहे हे पाहले पाहिजे. लोकप्रतिनिधींकडे जनतेची अपेक्षा असते. माझ्या आयुष्यात काही बदल घडला पाहिजे असे जनतेला वाटते. तसेच हा बदल जिथे घडतो त्या ठिकाणी लोकप्रनिधींना जनता पाठवते. मात्र, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं ते शरमेने मान खाली जावी असं कृत्य होतं. हे एका जबाबदार पक्षाने केलं.

    वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षणं नाहीयेत. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर सिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पाडयाला नकोय. त्यासाठी प्रत्येकाना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे.

  • 06 Jul 2021 03:53 PM (IST)

    भाजप आमदारांचे निलंबन रद्द करावे, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन

    उस्मानाबाद : भाजपचे 12 आमदार निलंबित केल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भास्कर जाधव यांच्या फोटोला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. तसेच भाजप आमदार यांचे निलंबन रद्द करावे व शिवसेना आमदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली . भास्कर जाधव यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

  • 06 Jul 2021 03:24 PM (IST)

    विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता

    मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता

    मुख्यमंत्री अध्यक्षपदासाठी सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती

    नागपूर अधिवेशन आधी अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता

  • 06 Jul 2021 12:59 PM (IST)

    कृषी विधेयक विधानसभेत सादर

    कृषी विधेयक विधानसभेत सादर

    केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देईल

    केंद्राच्या कृषी कायद्याच्या वेगळं हे विधेयक असणार

  • 06 Jul 2021 12:39 PM (IST)

    जर सर्व केंद्र सरकार करत असेल तर तु्म्हाला वडे तळायला बसवलंय का? - फडणवीस

    शेतकऱ्यांना मदत केंद्राने करावी

    कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, पीक विमा, राज्याचं अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतील आऱक्षण केंद्राने द्यावे, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकारने करावे,  १०० कोटीची वसुली कारवाई करणार केंद्र सरकार, रेमडेसिव्हीर केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन , ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसीकरण केंद्र सरकार

    जर सर्व केंद्र सरकार करत असेल तर तु्म्हाला वडे तळायला बसवलंय का? - फडणवीस

  • 06 Jul 2021 12:38 PM (IST)

    रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये, उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभागृहात माहिती 

    राज्यातल्या रिक्त पदांची माहिती घेतली

    २३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर

    पद भरण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल

    रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये, उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभागृहात माहिती

  • 06 Jul 2021 12:29 PM (IST)

    पीक विम्यावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

    नियम,  अटी शेतकऱ्यांच्या हिताचे हवेत

    पीक विम्यावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

    पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक

    पीक विमा मिळूच नये असा प्रयत्न

    सरकारची दडपशाही सुरु

    122% विमा आम्ही शेतकऱ्यांना दिला

    राज्य सरकार हे शेतकरीविरोधी सरकार

    13% कर्ज शेतकऱ्यांना मिळालं

    धान घोटाळ्याची सीबीआय चौकसी व्हावी

    धान खरेदी झाली नाही

    मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला

  • 06 Jul 2021 12:27 PM (IST)

    माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवरह आरोप - प्रताप सरनाईक

    माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवरह आरोप - प्रताप सरनाईक

    तपास यंत्रणांचा अयोग्य वापर

    घोटाळा झाला की नाही याचा तपास झाला नाही

    घोटाळ्याबाबत ईडीकडून अहवाल मागवा, सरनाईकांची मागणी

    मी गुन्हा केला नसेल तर गृहखात्याकडून क्लीन चीट द्यावी

  • 06 Jul 2021 12:22 PM (IST)

    मुंबई मॉडेलच्या नावाखाली पाठ थोपटवून घेतली, मुंबई मॉडेल नाही हे मृत्यूचं मॉडेल  - फडणवीस

    कोरोनाने मुंबई, पुणेसह अख्ख्या राज्याची वाट लावली

    मोदींना लसी दिल्या म्हणून राज्यात जास्त लसीकरण

    मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे मृत्यू लपवण्यात आले

    १७ हजार कोरोना मृत्यू मुंबईत लपवले

    मुंबई मॉडेलच्या नावाखाली पाठ थोपटवून घेतली

    मुंबई मॉडेल नाही हे मृत्यूचं मॉडेल

    मविआने १५५ कोटी कोणत्या जाहिरातींवर खर्च केले

    फडणवीसांचा ठाकरे सरकारचा सवाल

  • 06 Jul 2021 12:18 PM (IST)

    आमचा डीएनए त्यांना माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

    आमचा डीएनए त्यांना माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

    १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

    त्या दाबू शकल्या नाही

    उभा देश त्यांनी बंदीशाळा केला

    ११ लाख लोकांना तुरुंगात टाकलं

    तरी लोकशाही जिवंत ठेवणारे आम्ही लोक

  • 06 Jul 2021 12:16 PM (IST)

    लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम मविआच्या ठाकरे सरकारने केलंय  - फडणवीस

    मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत नाहीत

    पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणूनव घोषित करत नाहीत

    पत्रकारांना लोकलचा पास देत नाही

    लसीकरण करत नाही

    मार्शल पाठवून पत्रकारांचे कॅममेरे बंद करण्याचे काम,  लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम मविआच्या ठाकरे सरकारने केलंय

    आम्ही प्रसंगावधान दाखवलं नसतं तर त्या ठिकाणी मारामारी झाली असती

    त्यांना लोकशाहीची चाड नसली तरी आम्हाला आहे

    मी आपले आभार मानतो की आपण विधानसभेची बैठक येथे बोलावली आणि आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार दिला

    आम्ही राज्याचा गोंधळ मांडू नये म्हणून १२ आमदारांना निलंबित केलं

    मी बोलेन म्हणून मार्शल पाठवून आम्हाला तेथून हटवण्यात आले

    पण ते आमचा आवाज बदलू शकत नाही

  • 06 Jul 2021 12:08 PM (IST)

    रवी राणांना राजदंड पळवला

    रवी राणांना राजदंड पळवला

    त्यामुळे सभागृहाचं कामकाज थांबत नाही, असं भास्कर जाधाव म्हणाले

  • 06 Jul 2021 12:06 PM (IST)

    भास्कर जाधवांकडून आम्हाला धोका आहे - देवेंद्र फडणवीस

    काल आम्हाला लक्षात आलं की भास्कर जाधवांकडून आम्हाला धोका आहे

    काल शिवीगाळ त्यांनी केला आणि वरुन तेच म्हणतात की मला शिव्या दिल्या

    त्यामुळे त्यांना आमच्यापासून धोका हे धादांत खोटं आहे

  • 06 Jul 2021 12:00 PM (IST)

    महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय - देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय

    महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रयत्न

    आण्ही शांततेन आंदोलन करत असताना ज्या प्रकारे पत्रकारांना तेथून हाकलण्याचं काम करण्यात आलं

    कॅमेरे ओढले

    लोकशाहीची हत्या सुरु आहे

    या सरकारचा बुरखा फाटतोय

    यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय

    त्यामुळे महाराष्ट्र यांच्याविरोधात

    आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबित केलं

    पत्रकारांवरही दंडुकेशाही सुरु

    आम्ही प्रेसरुममध्ये आमचं अधिवेशन करु

    लोकशाहीच्या स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे करणार असेल तर आपल्याला जागरुक व्हावं लागेल

  • 06 Jul 2021 11:54 AM (IST)

    कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

    कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

    माध्यमांनाही हटवलं जातंय आता आम्ही तिथे जाऊन आंदोलन करु

    भाजपकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

    विधीमंडळ परिसरात गोंधळाचे वातावरण

    कितीही दहशत माजवली तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही

    आम्ही सरकारविरोधात बोलणार, यांचे पितळ उघडे पाडणार

    अध्यक्ष्यांच्या आदेशावरुन माध्यमांना धक्काबुक्की केली जातेय, ही हुकूमशाही आहे

  • 06 Jul 2021 11:53 AM (IST)

    विधीमंडळ परिसरातील वातावरण तापलं

    विधीमंडळ परिसरातील वातावरण तापलं

    भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई सुरु

    भाजपकडून  सरकारविरोधात घेषणाबाजी

  • 06 Jul 2021 11:50 AM (IST)

    भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून बसले

    भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून बसले

    भास्कर जाधवांकडून तात्काळ माईक, स्पीकर जप्त करण्याचे आदेश

    प्रतिविधानसभेतले माईक स्पीकर, बंद करण्याचे आदेश

  • 06 Jul 2021 11:48 AM (IST)

    भाजपच्या प्रतिविधानसभेवरुन सत्ताधारी सभागृहात आक्रमक

    भाजपच्या प्रतिविधानसभेवरुन सत्ताधारी सभागृहात आक्रमक

    भास्कर जाधव सभागृहात आक्रमक, तात्काळ भाजपची सभा बंद करण्याची मागणी

    पृथ्वीराज चव्हाणांकडूनही सभा बंद करण्याची मागणी

    भाजप नेत्यांना विधानसभेच्या आवाराच्या बाहेर काढा, भास्कर जाधव भडकले

    सुरक्षा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा

  • 06 Jul 2021 11:41 AM (IST)

    राज्यात बदल्याचं राजकारण कधीही झालं नाही, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात 

    फोन टॅपिंग केलं जातंय

    फोन टॅपिंग करण्याची गरज काय

    कुणाच्या आदेशाने फोन टॅप झाले

    रावसाहेब दानवे यांचा पीए, खासदार काकडे यांचा फोन टॅप केला गेला

    माझ्यासाठी  अमजद खान नावाचा कोड

    राज्यात बदल्याचं राजकारण कधीही झालं नाही

    आज विरोधक नेत्यांना धकमी देत आहेत

    नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

  • 06 Jul 2021 11:31 AM (IST)

    "विरोधकांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही" 

    भास्कर जाधवांनी मांडलेल्या प्रश्नांवर विधानसभा उपाअध्यक्षांचं उत्तर

    त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही

    त्यांनी परवानगी मागितलीच नाही

    विरोधकांवर कारवाईची सत्ताधाऱ्यांची मागणी

    भास्कर जाधवांना धमकीचे फोन त्यांना सुरक्षा देण्याची मागणी

    स्पीकर जप्त करण्याचे सुरक्षा रक्षकांना आदेश

    माजी आमदार विधिमंडळ परिसरात कसे आले?

  • 06 Jul 2021 11:28 AM (IST)

    त्यांना परवानगी दिली कोणी, भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल

    विरोधकांशिवाय विधानसभेचं कामकाज सुरु

    भाजपचं विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार

    भाजपच्या प्रतिविधानसभेवर आमदार भास्कर जाधवांचा सवाल, त्यांना परवानगी दिली कोणी

    विधानसभेच्या आवारात परवानगीशिवाय काहीही करता येत नाही

    विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणं देत आहेत

    त्यांच्याकडे परवानगी नाही

    परवानगी नसताना भाजपकडून सभा सुरु

    भाजपकडून नियमांचं उल्लंघन

  • 06 Jul 2021 11:19 AM (IST)

    सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गमावलं - विखे पाटील

    कोरोनाच्या नावाखाली सरकार पळ काढतंय

    आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे

    सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गमावलं

    शेतकरी वाऱ्यावर

    मराठा, ओबीसी समाज अस्वस्थ

    कोरोनाच्या काळात लाखो तरुणांचा रोजगार गेला

    अनेक उद्योग, व्यापार उध्वस्त झाले

    सरकारने कुठलाही आधार किंवा मदत केलेली नाही

    जनतेचे प्रश्न मांडायचे कुठे

    सरकार बोलू देत नाही

    हे सरकार अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवते

  • 06 Jul 2021 11:14 AM (IST)

    खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय - फडणवीस

    ज्या महाराष्ट्रात, शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीयांचे, विद्यार्थी, एमपीएससीचे, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर या सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय जे घडलंच नाही असं सांगून, धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून या ठिकाणी आमदारांना निलंबित केलं जातंय म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतोय.

    मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि ज्या प्रकारे या सरकारचा कारभार सुरुये त्यासंदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं मांडायचंय, या जुलूमी सरकारविरोधात आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी

  • 06 Jul 2021 11:09 AM (IST)

    कालिदास कोळंबकर भाजपच्या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

    कालिदास कोळंबकर भाजपच्या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

    विधीमंडळ परिसरातचत भाजपने प्रतिविधानसभा भरवली

    १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपची प्रतिविधानसभा

  • 06 Jul 2021 11:06 AM (IST)

    विधानसभेचं कामकाज सुरु

    पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस

    विधानसभेचं कामकाज सुरु

    उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताहेत

  • 06 Jul 2021 11:02 AM (IST)

    विधीमंडळ परिसरात भाजपने प्रतिविधानसभा भरवली

    भाजप प्रतिविधानसभा भरवणार

    विधीमंडळ परिसरात भाजपने प्रतिविधानसभा भरवली

    देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चद्रकांत पाटलांसह अनेक आमदार उपस्थित

  • 06 Jul 2021 10:41 AM (IST)

    भाजपचे बडे नेते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    १२ आमदारांच्या निलंबणाच्या निषेधार्थ भाजपचं राज्यभर आंदोलन सुरुये

    भाजपचे बडे नेते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    देवेंद्र फडणवीस, विखे पाटील चंद्रकांत पाटलांसह अनेक आमदार पायऱ्यांवर

    सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी

  • 06 Jul 2021 10:38 AM (IST)

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राज्य सरकार विधेयक आणणार

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राज्य सरकार विधेयक आणणार

    विधेयकाचं प्रारुप आज‌ कँबीनोटमध्ये माॉडणार

    प्रारुपावर चर्चा करुन विधेयकात‌ रुपांतर केले जाणार

  • 06 Jul 2021 10:36 AM (IST)

    मुंबईत भाजपकडून सरकारविरोधात आंदोलन

    मुंबईत भाजपकडून सरकारविरोधात आंदोलन

    भाजपचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर

    १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन

  • 06 Jul 2021 10:34 AM (IST)

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांची सरकारविरोधी घोषणाबाजी

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांची सरकारविरोधी घोषणाबाजी

    अधिवेशनचा दुसरा दिवसही वादळी ठरणार

  • 06 Jul 2021 10:28 AM (IST)

    सरकारने शेतकरी कायदा घाईत करु नका - प्रवीण दरेकर

    - प्रवीण दरेकर

    सरकारने शेतकरी कायदा घाईत करु नका

    सभागृहात कृषी कायद्यांवर चर्चा करा

    सत्तेला धोका असल्याने १२ आमदार निलंबित केले

    दरेकरांचा सरकारवर घणाघात

    विरोधकांची संख्या कमी करण्याचा कट

    लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न

    आंदोलनाचा वनवा राज्यभर पेटणारय़

  • 06 Jul 2021 10:23 AM (IST)

    महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला - चंद्रशेखर बावनकुळे

    महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या १२ आमंदारांना परत घेत नाहीत तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • 06 Jul 2021 10:18 AM (IST)

    12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात भाजपचं आंदोलन, महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळला

    भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं जात आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळण्यात आला. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं.

  • 06 Jul 2021 10:01 AM (IST)

    अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कॅबिनेची महत्त्वाची बैठक

    अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कॅबिनेची महत्त्वाची बैठक

    भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर चर्चा होणार

    तसेच पुढील रणनीति आखली जाण्याची शक्यता आहे

    लसीकरणाबाबत चर्चा होणार

    कृषी कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे

    तसेच विरोधकांना कसे उत्तर देणार याचीही रणनीति आखणार

  • 06 Jul 2021 09:59 AM (IST)

    विधानसभेच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले

    विधानसभेच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस

    आजच्या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

  • 06 Jul 2021 09:50 AM (IST)

    12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात भाजपचं आंदोलन

    नागपूर -
    - 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपूरात भाजपचं आंदोलन

    - भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात थोड्याच वेळात आंदोलनाला होणार सुरुवात

    - महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळणार असल्याची माहिती

    नागपुरातील बडकस चौकात होणार आंदोलन

Published On - Jul 06,2021 7:02 AM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.