AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, लगेज डब्यात केली ही सुविधा

पश्चिम रेल्वेने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकल ट्रेनमध्ये जादा आसनांची निर्मिती केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता लोकलमधून प्रवास करताना जास्त सोय होणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, लगेज डब्यात केली ही सुविधा
Dedicated Coaches for Senior Citizens
| Updated on: May 17, 2026 | 10:17 PM
Share

मुंबईतील उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना गर्दीत नीट प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयातून एका जनहित याचिकेतून निर्देश मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वेने आता मालडब्यांचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या खास डब्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोचमध्ये २७ ज्येष्ठ प्रवाशांना बसता येणार

नव्याने डिझाईन केलेल्या लगेजच्या या कोचमध्ये २७ प्रवाशांना बसण्याची सुविधा असेल. तसेच उभे रहाण्यासाठी देखील एक्स्ट्रा जागा असणार आहे. पीक अवर्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना चढता आणि उतरता येण्यासाठी या कोचच्या आतील भागात खास बदल केले आहेत. दरवाजांच्या जवळ एक्स्ट्रा सपोर्ट पोल आणि स्पेशल इमर्जन्सी लॅडर्स सारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. कोचला असे डिझाईन केले आहे की ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्करपणे सुरक्षितपणे प्रवास करता येईल.

हे पाऊल मुंबईतील जास्त गर्दी असलेल्या लोकल प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना बऱ्यात काळापासून भेडसावत असलेल्या त्रासाचा विचार करुन उचलले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलच्या डब्यात आरक्षित आसने आधीच आहेत. मात्र जास्त गर्दीमुळे अनेकदा आरक्षित आसनापर्यंत पोहचणे कठीण असते.त्यामुळे ही अतिरिक्त सोय करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत लगेजचे कोचचा दुसऱ्या आवश्यक कोचना कमी न करता त्यांचा पुनर्वापर करता येणार आहे. त्यामुळे ट्रेनच्या एकूण प्रवासी क्षमतेत कोणताही बदल होणार नाही. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ मध्ये ४.६२ कोटी अंदाजित खर्चाआधारे सुरु करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसभर १०५ लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यात ४० लोकलना आधीच अशा प्रकारे अपग्रेड केले आहे. उर्वरित ६५ लोकलना मार्च २०२७ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी बदलले जाणार आहे.

लगेज कोचला पूर्णपणे हटवले जाणार नाही

अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की जनरल लगेज कोचला पूर्णपणे हटवले जाणार नाही. त्यात थोडे बदल करुन अन्य प्रवाशांची सुविधा कमी न करता ज्येष्ठांच्या सोयी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगरीय लोकल नेटवर्कवर रोज सुमारे ५०,००० ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. नव्या डेडिकेटेड कोचमधून त्यांना आता जास्त सुरक्षित, आरामदायक आणि सन्मानजनक प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...