AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी ब्रिगेड ही संघटना काय आहे? संभाजी ब्रिगेडचं समाजकारण आणि राजकारण 5 मुद्द्यातून जाणून घ्या

2016साली निवडणुका लढवण्याचे संभाजी ब्रिगेडने जाहीर केले. मात्र संभाजी ब्रिगेड नेमकी काय आहे? त्याचा इतिहास, त्यांनी केलेली सामाजिक आणि राजकीय कामेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.

संभाजी ब्रिगेड ही संघटना काय आहे? संभाजी ब्रिगेडचं समाजकारण आणि राजकारण 5 मुद्द्यातून जाणून घ्या
संभाजी ब्रिगेड, शिवसेनेची युतीImage Credit source: tv9
| Updated on: Aug 26, 2022 | 3:37 PM
Share

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. आता पुढील निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. एकीकडे शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेडमुळे (Sambhaji Brigade) बळ मिळणार आहे. दोन्ही पक्षांचा इतिहास हा आक्रमक आंदोलनांचा आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजपाविरोधात लढण्यासाठी हा आक्रमकपणा या दोघांनाही कामी येणार आहे. शिवसेना तर आधीपासूनच सक्रिय राजकारणात (Politics) होती. तर मागील काही काळापासून संभाजी ब्रिगेड या संघटनेने राजकारणातही उडी घेतली. 2016साली निवडणुका लढवण्याचे संभाजी ब्रिगेडने जाहीर केले. मात्र संभाजी ब्रिगेड नेमकी काय आहे? त्याचा इतिहास, त्यांनी केलेली सामाजिक आणि राजकीय कामेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे. विविध

मुद्द्यांतून जाणून घेऊ, काय आहे संभाजी ब्रिगेड?

  1. स्थापना आणि उद्देश – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. पुरुषोत्तम खेडेकर हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. तेव्हा ते सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचे संघटन उभे करणे त्याचबरोबर समाजाचे प्रबोधन करणे हा प्रमुख उद्देश त्यावेळी होता. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची एक शाखा म्हटले जाते.
  2. या आंदोलनाने चर्चेत – 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर अचानक हल्ला करण्यात आला. एक जमाव आला आणि त्यांनी हल्ला केला. यात संस्थेच्या इमारतीची तसेच काही दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे नुकसान झाले. हा हल्ला संभाजी ब्रिगेडने केला. त्यानंतर संभाजी ब्रिगेड चर्चेत आली.
  3. गिरीष कुबेर यांच्यावर शाईफेक – नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. गिरीश कुबेर लिखित ‘रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
  4. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला – दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. त्यामुळे दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. डिसेंबर 2010मध्ये लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचा सहभाग होता.
  5. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध, वैचारिक प्रतिवाद – बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रातून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी मांडून बदनामी केल्याचा सातत्याने आरोप संभाजी ब्रिगेडकडून केला जातो. पुरंदरेंच्या आक्षेपार्ह लिखाणाला संभाजी ब्रिगेडने कायमच विरोध केला. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही विरोध करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड वैचारिक प्रतिवादाची पुरस्कर्ती संघटना आहे. आंदोलने करण्याआधी चर्चा करण्याचा प्रयत्न संघटनेकडून केला जातो. मात्र अनेकवेळा प्रतिसाद न मिळाल्यास आक्रमक होत आंदोलने करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात येते.

संभाजी ब्रिगेड, शिवसेना पत्रकार परिषद

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.