देश मोठा की धर्म? हिजाबच्या प्रश्नावर मद्रास कोर्टाचा सवाल; महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला
सध्या कर्नाटकासह संपूर्ण देशात हिजाबच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू आहे. कर्नाटकाच्या काही शाळा-महाविद्यालयात हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याला मुस्लिम विद्यार्थीनींनी विरोध केला आहे.

मुंबई: सध्या कर्नाटकासह संपूर्ण देशात हिजाबच्या (Karnatak Hijab) मुद्द्यावरून रणकंदन सुरू आहे. कर्नाटकाच्या काही शाळा-महाविद्यालयात हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याला मुस्लिम विद्यार्थीनींनी (Muslim Women) विरोध केला आहे. या वादात हिंदुत्ववादी (Hindutvawadi) संघटनाही उतरल्याने या वादाला धार्मिक रंग चढला आहे. हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात गेल्यावर कोर्टाने देश मोठा की धर्म? असा थेट सवालच केला आहे. देशातील काही शक्तींकडून धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याबद्दल मद्रास न्यायालयाने चिंताही व्यक्त केली आहे. धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या या गंभीर ताशेऱ्यानंतर टीव्ही 9 मराठी वेबने यावर एक पोल घेतला होता. हिजाबवर मद्रास हायकोर्टाचा सवाल, महत्त्वाचं काय आहे? असा सवाल आम्ही केला होता. त्यात देश की धर्म असे दोन पर्याय दिले होते. त्यावर महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मते दिली आहेत. सर्वाधिक लोकांनी देशच महत्त्वाचं म्हटलं आहे.
पोल आमचा, कौल तुमचा
मद्रास हायकोर्टाने देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारा सवाल केल्यानंतर हाच प्रश्न आम्ही पोल म्हणून वापरला. 16 तासांपूर्वी म्हणजे काल आम्ही हा पोल युट्यूबवर टाकला. हिजाबवर मद्रास हायकोर्टाचा सवाल, महत्त्वाचं काय आहे? असा सवाल आम्ही केला होता. त्यात देश की धर्म असे दोन पर्याय दिले होते. महाराष्ट्रातील जनतेने अर्थातच देशाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं या पोलमधून दिसून आलं आहे. 83 टक्के जनतेने देशच सर्वोच्च असल्याचं म्हटलं आहे. तर 17 टक्के लोकांनी धर्माला अधिक महत्त्व दिल्याचं दिसून आलं आहे. 17 टक्के लोकांनी धर्मच सर्वात महत्त्वाचा असल्याचं म्हटलं असलं तरी मोठ्या संख्येने राज्यातील जनता आजही धर्मापेक्षाही देशालाच सर्वाधिक महत्त्व दिल्याचं अधोरेखित झालं आहे.

tv9 marathi hijab-poll
कोर्ट काय म्हणाले?
मद्रास न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एमएन भंडारी आणि न्यायामूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने हा सवाल केला होता. काही लोक हिजाबच्या बाजूने आहेत. काही लोक टोपीच्या बाजूने आहेत तर काही लोकं आणखी कशाच्या बाजूने आहेत, हे सगळं स्तब्ध करण्यासारखं आहे. काही गोष्टींच्या आधारे फूट पडायला हा देश आहे की धर्म आहे? ही आश्चर्याची गोष्ट आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. यावेळी न्यायामूर्ती भंडारी यांनी हा देश पंथ निरपेक्ष असल्याचं म्हटलं. सध्या सुरू असलेल्या वादाने हाती काहीच लागणार नाही. फक्त देशात फूट पडेल, असं भंडारी म्हणाले.
काय आहे वाद?
साधारण 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येमाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली होती.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 February 2022 pic.twitter.com/rXKVpyP2hd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
हिजाब विरुद्ध भगवा! कर्नाटकातल्या कुंदापुरातल्या प्रकरणाला भगवं वळण
शिवजयंतीसाठी नियमावलीत शिथीलता मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार : अजित पवार
