AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शिवसेनेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो, भाजपने एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यातून भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे.

VIDEO: शिवसेनेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो, भाजपने एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा घणाघात
आदित्य ठाकरेंच्या मोठ्या घोषणा
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 1:13 PM
Share

पणजी: शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी गोव्यातून भाजपवर (bjp) जोरदार हल्ला केला आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर एनडीएतील (NDA) मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच आम्ही कोणत्याही घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असं आदित्य यांनी ठणकावून सांगितलं. तसेच आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही. तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्लाही चढवला.

मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती. मित्राला धोका होऊ नये. हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो. त्या काळात इतर पक्ष वाढत गेले. आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले. खासदार आणि मंत्री झाले. तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो. पण, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रत्येक गावात शाखा उघडणार

उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढत आहोत. मणिपूरमध्ये लढत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये लढलो. सिल्वासामध्ये विजय मिळाला. आज गोव्यात लढत आहोत. जो काही आमचा जनतेशी कनेक्ट होता तो आहेच. तो फॉर्मली कनेक्ट करण्यासाठी आम्ही लढत आहोत. गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार आहोत, असंही ते म्हणाले.

बोट दाखवण्यासाठी आलो नाही

यावेळी त्यांनी निवडणुकीतील घोडेबाजारावरही भाष्य केलं. शिवसेनेचे वाघ असतात. आणि वाघांचा बाजार नसतो. आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत. बोट दाखवण्यासाठी आलो नाही. क्रेडिटसाठी आलो नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

शिवजयंतीसाठी नियमावलीत शिथीलता मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार : अजित पवार

प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायत लढणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची खेळी?

Honey Singh | रॅप गायक हनीसिंगला सत्र न्यायालयाचा दणका, पाचपावली पोलीस ठाण्यात यावचं लागणार?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.