AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस यांच्या निशाण्यावर आलेले अनिल वडपल्लीवार कोण?; वडपल्लीवार म्हणाले, उद्याच…

राज्यभर चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अनिल वडपल्लीवार यांचे नाव घेतले असून ते नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. मात्र स्वत: अनिल वडपल्लीवार यांनी आपण कोणासाठी काम केलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वडपल्लीवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे-फडणवीस यांच्या निशाण्यावर आलेले अनिल वडपल्लीवार कोण?; वडपल्लीवार म्हणाले, उद्याच...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 31, 2024 | 8:07 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीधी महायुती सरकारने महिलांसाठी नवनवीन योजना आणल्या आहेत. यामधील लाडकी बहीण योजनेचा प्रचार राज्यभर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांविरोधात काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. यावरूनच नागपूरमधील लाडकी बहीण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडपल्लीवारांवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार नेमके कोण आहेत जाणून घ्या.

मी कोर्टात गेलो नाही. मी उद्या बोलणार आहे. माझं म्हणणं मांडणार आहे. मी उद्या सर्व बोलणार आहे. आज माझ्या तोंडून नका वदवून घेतो. कोर्टात मॅटर आहे, कुणाचाही पीए राहिलो नाही. माझ्या वकिलांचा सल्ला घेतो. माझा अनेक लोकांशी संबंध आला आल्याचं अनिल वडपल्लीवार यांनी म्हटलं आहे.

अनिल वडपल्लीवार यांनी ‘लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभांच्या विविध शासकीय योजनांना नागपूर खंडपीठात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. राज्याची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभाच्या इतर योजना आणि त्यासंदर्भातले राज्य सरकारची निर्णय अवैध घोषित करण्याची मागणी अनिल वडपल्लीवार यांनी त्यांच्या याचिकेतून केली आहे. सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे या योजना राज्याच्या हिताकरिता धोकादायक असल्याचे वडपलिवार यांनी त्यांच्या याचिकेत नमूद केले आहे. ज्यायाप्रकरणी नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला या प्रकरणाची सद्यस्थिती, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदींची माहिती 2 आठवड्यात न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

नाना पटोले यांचे निवडणूकप्रमुख होते, सुनील केदार यांचे राईट हँड म्हटलं जातं. माझ्या बहिणींनी एक गोष्ट सांगतो, तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू पण या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर  वडपल्ली हा आडवा पडणार आहे, कारण लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेला. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल वडपल्लीवार हे काँग्रेस पक्षासोबत काही संबंध नाही. लाडकी बहीणत तुमची फसवी योजना आहे. बहिणीच्या हातातू 100 रूपये घ्यायचे आणि तिच्या हातात पाच रूपये द्यायचे. महागाई वाढवली आहे. फसव्या योजनेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचं नाना पटोले म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं