कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?

सध्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका चहावाल्याला या कोव्हिड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिलं.

कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?
कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:19 PM

मुंबई: सध्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा (jumbo covid centre) वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका चहावाल्याला या कोव्हिड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी या चहावाल्याचे जवळचे संबंध असल्यानेच त्याला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रकरणावर भाष्य करावं लागलं आहे. जम्बो कोविड सेंटरच्या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा पवारांनी केला आहे. राजीव साळुंखे (rajiv salunkhe) असं या चहावाल्याचं नाव आहे. सोमय्यांच्या या थेट आरोपांमुळे हा चहावाला चांगलाच चर्चेत आला आहे. कोण आहे हा चहावाला? त्याचे राऊतांशी संबंध काय? याचा घेतलेला हा आढावा.

कोण आहेत चहावाला?

राजीव साळुंखे असं या चहावाल्याचं नाव आहे. 4 जानेवारी 1975 ही त्यांची जन्म तारीख आहे. परळला केईएम हॉस्पिटलसमोर त्यांचं सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाचं हॉटेल आहे. गेल्या 70 वर्षांपासूनचं हे हॉटेल आहे. त्यांचे वडील हे हॉटेल चालवायचे. आता राजीव साळुंखे चालवतात. याच परिसरात राजीव यांचं निवास आहे. ते सुजीत पाटकर यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. सुजीत पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे.

बेनामी पार्टनर

राजीव साळुंखे हे राऊतांचे बेनामी पार्टनर असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. साळुंखे यांना पुण्यातील 100 कोटींचं जम्बो कोव्हिड सेंटर दिलं गेलं आहे. हॉटेलचं केवळ एक लाख रुपये इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या साळुंखेंना 100 कोटींचं कंत्राट कसं मिळालं? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

आरोप काय?

लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे साळुंखे यांचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. 9 दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात 7 कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. 65 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. तसेच साळुंखेंना पुण्यातील 100 कोटींच्या जम्बो कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

साळुंखे काय म्हणाले?

राजीव साळुंखे यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. आम्ही काही चोरी केली नाही. रितसर सरकारच्या नियमानुसार आम्ही टेंडर मिळवलं आहे. त्यांना कुठून खोटी माहिती मिळाली माहीत नाही. सोमय्या सारखं चहावाला चहावाला असं म्हणत आहेत. माझ्या हॉटेलला जवळजवळ 70 वर्ष झाले आहेत. तेव्हा सोमय्यांचा जन्मही झाला नसेल. सोमय्या माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. मी सर्व डिटेल्स देईल. निश्चितपणे देणार आहे. मी मुंबईतच आहे. पण वकिलासोबत आहे. खोटेनाटे आरोप सुरू आहेत. आम्हालाही उत्तर द्यावे लागणार आहे. त्या संदर्भानच मी वकिलांना भेटलो आहे, असं साळुंखे यांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले. त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतलं नव्हतं. पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार, पीसीएमसी कमिशनर राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए कमिश्नर सुहास दिवसे आणि सीईओ जिल्हा परिषद आदींचा या कामात सहभाग होता. त्यांना पारदर्शकपणे काम करण्यास सांगितलं होतं. आजच्या मिटिंगमध्ये हाच विषय पहिला घेतला. या बैठकीत सर्व माहिती मिळाली. ती समजून घेतली. त्यासंदर्भात एक नोट तयार करण्यास सांगितलं आहे. ती नोट मीडियालाही देऊ. मात्र, या कोव्हिड सेंटरमध्ये काही चुकीचं झालं नाही, असं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर

VIDEO: चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं ‘टीव्ही9’ला रोखठोक उत्तर

अनिल देशमुख यांच्या डावी-उजवीकडील खोली उद्धव ठाकरेंना सॅनिटाईज करावी लागेल; किरीट सोमय्यांचा इशारा

Non Stop LIVE Update
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.