फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

तिला स्टार व्हायचं होतं... खूप मोठं व्हायचं होतं... तशी ती टिकटॉक स्टारही झाली... नंतर तिला समाजासाठी काही तरी करून दाखवायचं होतं... त्यानुसार तिनं सामाजिक-राजकीय कामात भागही घेतला. (who was pooja chavan? why she suicide?)

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

मुंबई: तिला स्टार व्हायचं होतं… खूप मोठं व्हायचं होतं… तशी ती टिकटॉक स्टारही झाली… नंतर तिला समाजासाठी काही तरी करून दाखवायचं होतं… त्यानुसार तिनं सामाजिक-राजकीय कामात भागही घेतला… आपल्या बंजारा समाजाच्या विकासासाठी तिची धडपड सुरू होती… पण एवढ्यानं पुरेसं नव्हतं…. तिच्या आकांक्षा मोठ्या होत्या… त्यामुळे तिला इंग्रजी सुधारावं असं वाटू लागलं… इंग्रजी आली तर जग जिंकू… आपली छाप पाडू आणि समाजासमोर चांगला आदर्श ठेवू असं तिला वाटलं असेल म्हणूनच तिनं इंग्रजी शिकण्यासाठी बीडवरून पुण्याची वाट धरली… ती पुण्यात आली… दोन आठवडेही राहिली नाही तोच आत्महत्या केली?… नेमकं काय घडलं… पूजा चव्हाणनं टोकाचं पाऊल का उचललं?… कोण होती ही पूजा चव्हाण….? वाचा सविस्तर! (who was pooja chavan? why she suicide?)

पूजा मूळची बीडची

पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातील परळीची होती. पूजा सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह होती. पूजाही बंजारा समाजातील होती. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ती हजर राहायची. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात ती सातत्याने सक्रिय असायची.

Pooja Chavanटिकटॉक स्टार

पूजाला सोशल मीडियाची प्रचंड क्रेझ होती. ती सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. टिकटॉकवर ती सातत्याने व्हिडीओ टाकायची. ती टिकटॉक स्टार होती. टिकटॉकवर तिचा मोठा फॅन फॉलोइंग होता.

Pooja Chavanइंग्लिश स्पिकिंगसाठी पुण्यात आली

पूजा काही दिवसांपूर्वीच बीडवरून पुण्याला आली होती. पुण्यात इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी ती पुण्यात आली होती. पुण्यात येऊन तिला दोनच आठवडे झाले होते. पुण्यातील वानवडी येथील महमंदवाडीच्या हेवन पार्क सोसायटीत ती राहत होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि चुलत भाऊही राहत होते, असं सूत्रांनी सांगितलं.

Pooja Chavanतरुणींची रोल मॉडल

पूजा टिकटॉकवर नेहमी सक्रिय असायची. इन्स्टाग्रामवरही ती सक्रिय होती. तिला फॅशनेबल राहायला आवडायचं. तसेच सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमातही ती भाग घ्यायची. त्यामुळेच अवघी 22 वर्षीय असूनही तरुणींची रोल मॉडल झाली होती. तरुणींनाही पूजा सारखं व्हावंसं वाटायचं.

Pooja Chavanआत्महत्येनं गूढ वाढलं

पूजाला कोणताही त्रास नसताना आणि सर्व काही सुरळीत सुरू असतानाच तिने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पूजाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी ट्रिटमेंट करत होती, असं सांगितलं जातं. पण ती कसली ट्रिटमेंट घेत होती हे अद्याप उघड झालेलं नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे.

Pooja Chavanमंत्र्याचा हात?

पूजा आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांचं नाव आलं आहे. या मंत्र्याच्या 11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यामुळे हा संशय अधिकच बळावला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pooja Chavanफडणवीसांचं पत्रं

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्रं लिहिलं आहे. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी पोलिसांना केली आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूजाचा लॅपटॉप स्कॅन करून पोलिसांनी अधिक माहिती मिळवावी अशी मागणी केली आहे.

Pooja Chavanमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वनमंत्री संजय राठोड यांचीही बाजू ऐकून घेणार असल्याचं समजतं. त्यानंतरच मुख्यमंत्री पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. (who was pooja chavan? why she suicide?)

Pooja Chavan

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

(who was pooja chavan? why she suicide?)

Published On - 9:54 am, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI