AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022: पवार, बाजोरियांचा पराभव जिव्हारी, सेना आमदार म्हणतात, काँग्रेस, राष्ट्रवादीला मते कशाला द्यायची?

MLC Election 2022: शिवसेनेची मते शिवसेनेच्याच आमदारांना मिळायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अतिरिक्त मते कशाला द्यायची? असा सवाल शिवसेना आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

MLC Election 2022: पवार, बाजोरियांचा पराभव जिव्हारी, सेना आमदार म्हणतात, काँग्रेस, राष्ट्रवादीला मते कशाला द्यायची?
सेना आमदार म्हणतात, काँग्रेस, राष्ट्रवादीला मते कशाला द्यायची?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 3:26 PM
Share

नागपूर: राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेते एकदिलाने विधान परिषदेची  (Maharashtra MLC Election) निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधान परिषद निवडणूक उद्यावर आलेली असतानाच आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीत संजय पवार यांचा झालेला पराभव आणि त्या आधी विधान परिषदेच्या निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव शिवसेना आमदारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कशाला करायचं? असा सवाल शिवसेनेचे आमदार करत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारालाच शिवसेनेची (shivsena) मते मिळायला हवीत, असं  शिवसेनाआमदार म्हणत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेची मते शिवसेनेच्याच आमदारांना मिळायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अतिरिक्त मते कशाला द्यायची? असा सवाल शिवसेना आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेकडे 8 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे ही मते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

दुसरा उमेदवार अडचणीत?

विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे अतिरिक्त मते नाहीत. मात्र, काँग्रेसच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 17 मते हवी आहेत. एमआयएमने एक मत काँग्रेसला देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे 18 मते आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला अजून 9 मतांची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने अतिरिक्त मतांची बेगमी पुरवल्यास काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. पण शिवसेनेच्या आमदारांनी वेगळीच भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचं दबावतंत्र?

काँग्रेसला शिवसेनेच्या चार अतिरिक्त मतांची गरज आहे. ही मते मिळावीत म्हणून काँग्रेसने दबावतंत्र सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. या चार मतांसाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवल्याचं सांगितलं जात आहे. तर, कोणत्या पक्षाला किती मते द्यायची? याची रणनीती ठरली आहे. तुम्हाला मतदानाच्या दिवशी ती दिसून येईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य